हॉर्नचे प्रदूषण रोखण्यासाठी  'नो हॉर्न प्लीज'चा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

या वेळी "नो हॉर्न प्लीज' उपक्रमाची माहिती आरटीओ अधिकारी संजय ससाणे यांनी दिली. भागवत यांनी कल्याण आरटीओ कार्यालयामार्फत वाहनचालक व नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध सुविधांची पाहणी करताना माहिती घेतली.

कल्याण : कल्याण आरटीओ आणि कल्याणमधील विविध रिक्षा संघटना, तसेच मुंबई रिक्षामेन्स युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने "नो हॉर्न प्लीज'चा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. वाहनांच्या हॉर्नमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी हा उपक्रम आहे. राज्याचे विधी व न्याय विभाग सचिव राजेंद्र भागवत यांच्या हस्ते आज (ता. 7) कल्याण आरटीओ कार्यालय परिसरात त्याचे उद्‌घाटन करण्यात आले. 

या वेळी "नो हॉर्न प्लीज' उपक्रमाची माहिती आरटीओ अधिकारी संजय ससाणे यांनी दिली. भागवत यांनी कल्याण आरटीओ कार्यालयामार्फत वाहनचालक व नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध सुविधांची पाहणी करताना माहिती घेतली. त्यांनी या 
उपक्रमाचे कौतुक करीत हॉर्नचे प्रदूषण रोखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. या वेळी कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे, आय. एच. मासुमदार, मुंबई रिक्षामेन्स युनियन पदाधिकारी तंबी कुरियन, शिरीष नाईक, विविध रिक्षा संघटना पदाधिकारी, आरटीओ अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते. 

क्‍लृप्त्यांचा वापर 

या उपक्रमाद्वारे जनजागृती करण्यासाठी विशेष क्‍लृप्त्यांचाही वापर केलेला दिसून आला. या वेळी अनेक रिक्षांच्या पाठीमागे "नो हॉर्न प्लीज'चे स्टिकर लावण्यात आले होते. हॉर्नच्या अतिरिक्त आवाजाबद्दल निषेध व्यक्त करण्यासाठी एका रिक्षाला 150 हून अधिक हॉर्नने सजवण्यात आले होते. 

Web Title: horn pollution no horn please