घोड्यावरून पडून मुलगा जखमी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

रशिदाची सुटका करून नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला मुंबईतील रुग्णालयात हलवल्यात येणार आहे. दरम्यान, या वेळी माथेरानची अत्यावश्‍यक रुग्णवाहिकाही उपलब्ध नव्हती. 

माथेरान : मुंबईहून माथेरानमध्ये पर्यटनासाठी आलेला नऊवर्षीय मुलगा घोड्यावरून पडून जखमी झाला. त्याच्या डोक्‍याला जबर दुखापत झाली आहे. मुंबईहून माथेरानमध्ये पर्यटनासाठी 20 जणांचा रेडिओवाला परिवार आला होता. शनिवारी या परिवाराने 15 घोडे सवारीसाठी मागवले होते. 

यातील हसन रेडिओवाला यांची मुलगी रशिदा ही एका घोड्यावर बसली. घोडा ऍलेक्‍झांडर पॉइंटच्या नजीक आला, त्या वेळी घोड्याने उडी घेतल्याने मालकाच्या हातातून तो निसटला. रशिदाचा तोल जाऊन तिचा पाय रिकिबीत अडकला. घोड्याने आणखी वेग घेतल्याने ती काही अंतर फरफटत गेली. त्या वेळी घोड्याचे मालक एकनाथ शिंदे यांनी तत्परता दाखवत घोडा नियंत्रणात आणला.

रशिदाची सुटका करून नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला मुंबईतील रुग्णालयात हलवल्यात येणार आहे. दरम्यान, या वेळी माथेरानची अत्यावश्‍यक रुग्णवाहिकाही उपलब्ध नव्हती. 

Web Title: Horse Riding Boy injured