Coronavirus : कर्मचाऱ्यांबाबत मुंबई महापालिकेचा महत्वाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 May 2020

कोरोनोचा वाढता धोका लक्षात घेता मुंबई महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, कामगारांच्या निवासाची सोय मुंबईतच करण्यात येणार आहे.

मुंबई :  कोरोनोचा वाढता धोका लक्षात घेता मुंबई महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, कामगारांच्या निवासाची सोय मुंबईतच करण्यात येणार आहे. मुंबईबाहेर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पदांनुसार विविध हॉटेलमध्ये ही सोय केली जाणार आहे. 

नक्की वाचा : "विवाह संसर्गजन्य व्यक्तीच्या संपर्कात आल्या आल्या लगेचच"; या लग्नाची आहे जोरदार चर्चा...

अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत येणाऱ्यांची सोय मुंबईतच करावी, अशी मागणी नवी मुंबईचे महापौर जयंत सुतार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. या कर्मचाऱ्यांमुळे नवी मुंबईत कोरोना पसरण्याचा धोका असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्याचबरोबर मुंबई शेजारील इतर शहरांतूनही अशी मागणी करण्यात येत होती. 
मुंबई पालिकेत शहराबाहेरून रोज कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्यामुळे इतर शहरांतही कोरोना पसरण्याची भिती होतीच शिवाय त्यांच्या प्रवासाच्याही अडचणी होत्या. त्यामुळे खबरदारी म्हणून पालिकेतर्फे या कर्मचाऱ्यांची सोय हाॅटेलमध्ये करण्यात येणार आहे.

मोठी बातमी : 'या' तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार विधान परिषद आमदार...

सध्या ताळेबंदीमुळे हॉटेल व्यवसायिकही पालिका कर्मचाऱ्यांसाठी माफक दरात खोल्या उपलब्ध करुन देण्याबाबत तयारी दाखवत आहेत. ताज हॉटेलच्या एका खोलीचे दैनंदिन भाडे 15 हजार रुपये आहे; मात्र पालिका कर्मचाऱ्यांना 2 हजार रुपयांत ही सुविधा देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर कर्मचाऱ्यांना मुंबईतील हॉटेलमध्ये राहाण्याची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव  कार्यकारी  वैद्यकिय अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांच्यासमोर मांडला होता. या प्रस्तावाला आयुक्तांनी मंजूरी दिली आहे.

हे ही वाचा सोशल मीडियावर ट्रेंडिंग 'स्मायली' काढतेय भाजप नेत्यांना चिमटे; पण ही स्मायली आहे तरी कोण ?

असे असणार दर 
(दोन जणांसाठी एक खोली) 

  • पंचतारांकित हॉटेल्स -  2 हजार रुपये अधिक कर 
  • चार तारांंकित हॉटेल्स - 1 हजार 500 रुपये अधिक कर 
  • तीन तारांंकित हॉटेल्स - 1 हजार रुपये अधिक कर 
  • साधे हॉटेल्स - 500 रुपये अधिक कर

 Hotel accommodation for employees from outside of Mumbai Municipal 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hotel accommodation for employees from outside of Mumbai Municipal