मुसळधार पावसामुळे घर कोसळले

house collapsed due to heavy rains
house collapsed due to heavy rains

मोखाडा : मोखाड्यातील खोडाळा येथील रहिवासी पांडुरंग थाळेकर यांचे पक्के घर, शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोसळले आहे. त्यावेळी घरात असलेली त्यांची पत्नी वंदना आणि मुलगा कुणाल हे सुदैवाने बचावले आहेत. मात्र, घराचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, थाळेकर यांचा संसार ऊघड्यावर आला आहे.

मोखाड्यात 8 सप्टेंबरला शनिवारी सकाळी मुसळधार पाऊस झाला. या पावसात खोडाळा इंदिरानगर मधील आदिवासी पांडुरंग थाळेकर यांचे पक्के घर सकाळी 9 वाजेच्या दरम्यान कोसळले आहे. त्यावेळी त्यांची पत्नी वंदना स्वयंपाक घरात काम करत होती. तर मुलगा कुणाल हा मधल्या खोलीत अभ्यास करत होता. मागच्या बाजुला भिंत कोसळण्याचा आवाज येताच या दोन्ही माय - लेकांनी जिव मुठीत धरुन घरातून बाहेर पळ काढला, त्यामुळे सुदैवाने ते बचावले आहे.

थाळेकर हे खोडाळा इंदिरानगरचे शिवसेना शाखा प्रमुख आहेत. सदरची घटना समजताच मोखाडा पंचायत समितीचे सभापती प्रदीप वाघ, विक्रमगड विधानसभा संघटक प्रल्हाद कदम व वाकडपाड्याचे सरपंच संजय वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन, थाळेकर कुटुंबाची भेट घेतली आहे. तसेच थाळेकर कुटूंबाला शासनाकडून तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सभापती प्रदीप वाघ यांनी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com