esakal | Ayodhya Verdict : अयोध्या निकालाकडे कसं पाहतंय बॉलीवूड?
sakal

बोलून बातमी शोधा

Ayodhya Verdict : अयोध्या निकालाकडे कसं पाहतंय बॉलीवूड?

सर्वोच्च न्यायालयाच्या अयोध्या प्रकरणी निर्णयाचे सेलिब्रिटींनी केले स्वागत 

Ayodhya Verdict : अयोध्या निकालाकडे कसं पाहतंय बॉलीवूड?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सर्वोच्च न्यायालयानं अयोध्या प्रकरणी निकाल दिला आहे. या निर्णयानंतर काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे आणि सोशल मिडियावरद्वारे आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भंडारकर, अभिनेत्री हुमा कुरेशी, अभिनेता फरहान अख्तर, कुणाल कपूर सारख्या काही कलाकारांनी ट्विटरवरून आपली मत मांडली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करत शांतता राखण्याचे आवाहन सेलिब्रिटींनीही केले आहे.

दिग्दर्शक मधुर भंडारकर हे सोशल मिडियावर प्रतिक्रया देत म्हणाले की,"अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. बहुप्रतीक्षीत या निर्णायाचा अखेर तोडगा निघाला.' असं ट्विट मधुर यांनी केले.

तसेच अभिनेता फरहान अख्तरही ट्विट करत म्हणाला की,"मी सर्वांना नम्र विनंती करतो की न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आपण सर्वांनी सन्मान करावा. आणि या निर्णयाचा मनापासून स्वीकारही करावा मग तो तुमच्या बाजूने असो किंवा नसो.

सध्या आपल्या देशाला एकत्रित येऊन पुढे जाण्याची गरज आहे.' त्याचबरोबर "या निर्णयाचं मी स्वागत केलं आहे. ही वेळ शांतता राखण्याची आहे. आपण सर्व एकमेकांप्रती संवेदनशील राहूया.' असं अभिनेता कुणाल कपूर ट्‌विटरद्वारे म्हणाला.

तसेच अभिनेत्री हुमा कुरेशी ट्विट करत म्हणाली की, "माझ्या प्रिय भारतीयांनो आज अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचा सन्मान करूया. आपण सर्वांनी एकत्रित मिळून एक राष्ट्राच्या रुपानं पुढे जाण्याची गरज आहे.' 

Webtitle : this is how bollywood reacted to ayodhya verdict given by supreme court