#RepublicDay2020: असं काढा प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या परेडचं तिकीट

सकाळ वृत्तसंस्था
Sunday, 19 January 2020

२६ जानेवारी १९५० या दिवसापासून भारताचे संविधान अमलात आले आणि म्हणूनच २६ जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत असतो. दर वर्षी दिल्लीत राजपथावर म्हणजेच 'इंडिया गेट' (India Gate) ते राष्ट्रपति भवन (Rashtrapati Bhavan) दरम्यान प्रजासत्ताक दिनाची परेड (Republic Day Parade) होत असते.

२६ जानेवारी १९५० या दिवसापासून भारताचे संविधान अमलात आले आणि म्हणूनच २६ जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत असतो. दर वर्षी दिल्लीत राजपथावर म्हणजेच 'इंडिया गेट' (India Gate) ते राष्ट्रपति भवन (Rashtrapati Bhavan) दरम्यान प्रजासत्ताक दिनाची परेड (Republic Day Parade) होत असते.

दिल्लीच्याच नव्हे तर सपूर्ण भारतातील प्रेक्षकांची गर्दी ही परेड बघण्यासाठी होत असते. यावर्षी २६ जानेवारीला रविवार येतोय आणि त्यामुळे या परेडला प्रेक्षकांची चांगलीच गर्दी होणार आहे. त्यासाठीच तिकीटांची व्यवस्था भारत सरकार कडून करण्यात आलीये. ७ जानेवारी ते २५ जानेवारी दरम्यान तिकीट विक्री सुरू असणार आहे. 

एक नंबर - जेव्हा ऍमेझॉनचे मालक स्वतः देतात पॅकेजची डिलेव्हरी..

 

Image result for republic day parade

काय असेल यंदाच्या प्रजासत्ताक दिनाची खासियत - 

 • पंतप्रधानांचे देशाला संबोधन
 • ब्राझिलचे राष्ट्रपति जाइर बोलसेनरो हे मुख्य अतिथि असतील 
 • विविध बटालियनच्या जवानांची परेड
 • भारतीय वायुसेनेतर्फे एयर शो
 • विविध राज्याचे मनमोहक चित्ररथ 

अरेरे - 'बोस' कंपनीने घेतला मोठा निर्णय, अनेकांच्या नोकऱ्या जाणार..

कुठं मिळतील तिकिटं ? 

प्रजासत्ताक दिनाच्या परेडची तिकिटं दिल्लीतील काही ठराविक ठिकाणांवर उपलब्ध असणार. जाणून घ्या कोणत्या आहेत या जागा.. 

 • सेना भवन (गेट नंबर ०२), दिल्ली 
 • प्रगती मैदान (गेट नंबर ०१), दिल्ली
 • जंतरमंतर मुख्य गेट, दिल्ली
 • शास्त्री भवन, दिल्ली
 • जामनगर हाऊस, दिल्ली
 • लाल किल्ला, दिल्ली
 • संसदेचे कार्यालय, दिल्ली
 • नॉर्थ ब्लॉक सर्कल, दिल्ली 

या सर्व ठिकाणांवर जाऊन आपण प्रजासत्ताक दिनाच्या खास कार्यक्रमाची तिकिटं विकत घेऊ शकतात. मात्र तिकीट खरेदी करताना तुम्हाला तुमचं आधार कार्ड किंवा फोटो आयडी दाखवणे बंधनकारक राहणार आहे. याचसोबत प्रत्येक, प्रत्येक सेंटरवर विकण्यात येणाऱ्या तिकिटांची संख्या लिनितेंद असणार आहे. त्यामुळे जेवढं लवकर जाल तेवढं लवकर तिकीट मिळेल. 

Related image

 

तिकिटांचे दर माहिती आहेत का ? 

प्रजासत्ताक दिनाची परेड बघण्यासाठी प्रत्येकी  ५००/-, १००/- आणि २०/- अश्या प्रकारची तिकिटं उपलब्ध आहेत. त्याबरोबरच बीटिंग रीट्रीट सोहळ्यासाठी प्रत्येकी ५०/- आणि २०/- अश्या प्रकारे तिकीटांचे दर असणार आहेत.

मोठी बातमी मोठा किस्सा झाला, पोलिसांना बिर्याणी पडली महाग..

एक मिनिट, खालील वेळेतच मिळतील तिकिटं -

तिकीट विक्री सकाळी १० ते १२.३० आणि दुपारी २ ते ४.३० या वेळात ७ जानेवारी ते २५ जानेवारी दरम्यान उपलब्ध असणार आहेत. 

how to buy republic day parade tickets check full details  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: how to buy republic day parade tickets check full details