5 मिनिटात ओळखा नकली आणि बोगस माणसांना

5 मिनिटात ओळखा नकली आणि बोगस माणसांना

आपल्या आपल्या सार्वजनिक आयुष्यात अनेक प्रकारची लोकं कायमच भेटत असतात. त्यापैकी काही चांगली असतात, तर काही आतल्या गाठीची, नकली, खोटारडी किंवा बनावटी असतात. बनावटी लोकं कायम आपल्याला भासवतात ते किती चांगले आहेत, त्यांना तुमची किती काळजी आहे. पण आतून काहीतरी वेगळच असतं. अशा लोकांना ओळखणं कठीण असतं. पण, अश्या लोकांना ओळखायचं कसं? काळजी करू नका, आम्ही तुम्हाला सांगतो नकली आणि बोगस लोकांना कसं ओळखायचं ? 

  • कामापुरता मामा 

अशी अनेक लोकं असतात जे तुमचा कायम आदर करतील, चांगलं वागतील पण फक्त काम असेपर्यंत.. म्हणजे ते तुम्हाला सारखा फोन करतील, तुमची विचारपूस करत राहतील. कारण त्याचं तुमच्याकडे काहीतरी काम आहे. आणि जेंव्हा तुम्ही ते कराल , त्याच्या दुसऱ्या मिनिटापासून ते तुम्हाला विसरून जातील. उदाहरणार्थ एखाद्या मित्राला तुमच्याकडून पैसे हवे असतील तर ते तुम्हाला सारखा फोन करतील. तुमची कसे आहात, घराचे कसे आहेत हे सगळं विचारात राहतील. आणि हळूच तुमच्याकडून पैसे मागतील. तुम्ही एकदा त्यांना पैसे दिलेत त्यानंतर अशी लोकं गायब होता.            

  • अति उत्साहीपणा

काही लोकं तुम्हाला भेटल्यावर अति उत्साही असतात. ही एक अशी खुण आहे ज्याच्यामुळे तुम्ही खोट्या लोकांना ओळखू शकतात. आता उदाहरण द्यायचं झालं तर, तुम्ही तुमच्या एका अश्या मित्राला खूप वर्षानंतर भेटलात ज्याचा गेले अनेक वर्ष किंवा महिने काहीच  संपर्क नाही. पण, तुम्ही भेटल्यावर तो मित्र तुम्हाला पाहून फारच उत्साही होतो. तुम्हाला मिठी मारतोय. पण थोड्या वेळाने तुमचं तुम्हालाच समजेल की हा फक्त खोटेपणा आहे. अशी लोकं तुम्हाला म्हणतील, काय तुम्ही फोनच नाही करत, भेटत नाहीत. अशी लोकं तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करत असतात. 
 

  • सतत स्वतःबद्दल बोलणं 

एखाद्या नकली माणसाची खुण म्हणजे, सतत स्वतःबद्दल बोलणं. अशी लोकं कायम स्वतःबद्दल सांगत राहतात. मी या आताच असं केलं तसं केलं, माझ्याकडे कशी एखादी गोष्ट चांगली आहे. ते कायम त्यांच्याबद्दल बढाया मारत राहतात. प्रामाणिक माणसांचा प्रामाणिकपणा दिसून येतो. बनावटी लोकं फक्त बढायाच मारत असात. स्वतःबद्दल गुणगान गाणारी लोकं बोगस आणि नकली असतात. 

  • छुप्या पद्धतीने अपमान करणारी लोकं

अनेक लोकं तुमचा छुप्या पद्धतीने अपमान करतात. तुम्हाला ते फार चांगलं चांगलं बोलतील आणि शेवटी असं काहीतरी बोलतील ज्याच्यामुळे तुमचा अपमान होईल. उदाहरणार्थ, ते तुम्हाला विचारतील अरे तुझं घड्याळ किती छान आहे. सगळ्यांना सांगतील तुमचं घड्याळ किती छान आहे. पण, शेवटी तुम्हाला विचारतील, हे कुठून घेतलं? आणि म्हणतील अरे त्या दुकानात तर सगळ्या गोष्टी फारच स्वस्त आणि कधी कधी खोट्या मिळतात. ज्याच्यामुळे तुम्हाला फार वाईट वाटेल. म्हणजे काय? तर छुप्या पद्धतीने ते तुमचा अपमान करतील. 

  • नीट ऐकून नं घेणारी लोकं

अशी लोकं तुमच्या बोलण्यावर अजिबात लक्ष देत नाहीत. ते तुम्हाला आधी प्रश्न विचारतील, पण नंतर तुम्ही बोलायला लागलात की ते एकतर मोबाईलमध्ये बघत बसतील किंवा त्याचं लक्ष इतरत्र असेल. अशा लोकांपासून सावधान व्हा. अशी लोकं तुमचा घात करू शकतात. चांगली लोकं कायम तुमचं म्हणणं नीट ऐकून घेतात. वेळ आली की तुम्हाला योग्य दिशा दाखवतात. 

  • दुसऱ्याच्या दु:खात आनंद शोधणारी लोकं

नकली लोकांना दुसऱ्यांच्या दु:खाबद्दल कायम बोलत राहायला आवडतं. सुरवातीला तुम्हाला वाटेल अश्या लोकांना इतरांबद्दल खूप सहानुभूती आहे. आणि त्यांच्या मदतीसाठी ते दुसर्याच्या दुःखाचा विषय काढतायत. पण असं नसतं, अशांना फक्त दुसर्याच्या दुःखाबद्दल बोलायला कायम आवडत असतं. त्यामुळे अश्या लोकांपासून सावध रहा, कारण ही लोकं तुमच्या मागे. तुमच्याबद्दल अनेक गोष्टी बोलत असतील.

तुमच्या आसपास अशी जर लोकं असतील तर जरा सावध रहा. अशा लोकांपासून चार हात राहिलेलंच बरं.

WebTitle : how to identify fake people

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com