एपीएमसीत मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

नवी मुंबई - एपीएमसीतील ट्रक टर्मिनल यार्डमधील देवीज्योती बारजवळच्या नाल्यामध्ये सोमवारी सकाळी एका अनोळखी व्यक्तीचा सांगडा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा सांगाडा हा पुरुषाचा की महिलेचा? हे स्पष्ट होऊ शकलेले नाही, त्यामुळे एपीएमसी पोलिसांनी हा सांगाडा ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी पाठवून दिला आहे. तसेच अज्ञात व्यक्तीच्या हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. 

नवी मुंबई महापालिकेकडून सध्या पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई सुरू आहे. सोमवारी महापालिकेचे कर्मचारी एपीएमसीतील देवीज्योती बारलगतच्या नाल्याची साफसफाई करण्यासाठी गेले असताना, त्यांना या नाल्यामध्ये मृत व्यक्तीची हाडे आणि कवटी असा भाग या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हा सांगाडा ताब्यात घेतला. 

त्यामुळे पोलिसांनी हा सांगाडा मुंबईतील जे.जे. रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठविला आहे. हा मृतदेह तीन ते चार महिन्यांपूर्वी या ठिकाणी टाकून दिल्याची शक्‍यता पोलिसांकडून व्यक्त होत आहे. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह नाल्यामध्ये टाकून देण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने एपीएमसी पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. 

Web Title: human scandal found in APMC