'हुनर हाट' म्हणजे देशाचे प्रतिबिंब : मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 डिसेंबर 2018

मुंबई : "हुनर हाट'च्या निमित्ताने भारताचे छोटे स्वरूपच पाहायला मिळाले, असे गौरवोद्‌गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्‍स येथील एमएमआरडीएच्या मैदानावर भारत सरकारच्या अल्पसंख्याक मंत्रालयातर्फे आयोजित हुनर हाटच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी केंद्रीय अल्पसंख्याक आणि संसदीय कामकाज मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, आमदार आशीष शेलार, अल्पसंख्याक आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष हाजी हैदर आझम आदी उपस्थित होते. 

21 ते 31 डिसेंबरपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार असून, देशभरातील विविध ठिकाणचे कारागीर, दस्तकार, शिल्पकार यामध्ये सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भारत सरकारच्या या उपक्रमामुळे अशा घटकांना मार्केट आणि संधी उपलब्ध झाली आहे. भारत सरकारच्या योजना अशा घटकांसाठी महत्त्वपूर्ण आहेत. या वेळी मुख्यमंत्र्यांनी प्रदर्शनाची पाहणी केली. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले, दस्तकार शिल्पकारांना बाजारपेठ देण्यासाठी देशाच्या विविध भागात आयोजित हुनर हाट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया, स्टॅंड अप इंडिया, स्टार्ट अप इंडिया या संकल्पना साकार करणारा प्रामाणिक आणि विश्‍वसनीय ब्रॅंड बनला आहे. 

Web Title: Hunar Haat means the reflection of the country says Devendra Fadnavis