ये बात ! शंभर वर्षांच्या आजीबाईंची 'कोरोना'वर यशस्वी 'मात'

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 June 2020

ठाणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची 23 हजाराच्या पार गेली आहे. तर, मृतांची संख्या 812 इतकी झाली आहे.

ठाणे : जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच अनेकांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून मंगळवारी (ता.23) ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका 100 वर्षीय महिलेसह 85 आणि 91 वर्षाच्या दोन महिलांनी देखील कोरोनावर मात करत घर गाठले. यावेळी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना आनंदी वातवरणात निरोप दिला.

नक्की वाचा : तब्बल 22 कोटी 70 लाख रुपये खर्चूनही कोरोनाचा नियंत्रणात नाही, मुंबईकर विचारतायत चाललंय काय ?

ठाणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची 23 हजाराच्या पार गेली आहे. तर, मृतांची संख्या 812 इतकी झाली आहे. तसेच 12 हजार रुग्ण कोरोनामुक्त देखील झाले आहे.

मोठी बातमी - मुंबईनंतर आता नवी मुंबईच्या आयुक्तांची तडकाफडकी बदली...

अनेकांनी इच्छाशक्ती आणि रोगप्रतिकार शक्तीच्या जोरावर कोरोनावर मात केली आहे. यामध्येच शहरातील मध्यवर्ती भागातील आंबेडकर रोड येथे राहणाऱ्या 100 वर्षीय आजीबाईसह रघुनाथ नगर येथे राहणाऱ्या 91 वर्षीय तर, जिल्हा रुग्णालयाच्या शेजारील पोलीस लाईन परिसरात राहणाऱ्या 85 वर्षीय आजीबाईंचा समावेश असून या तिघींनी योग्य उपचार व इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनावर विजय मिळविला आहे.

Hundred year old grandmother successfully defeats Corona


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hundred year old grandmother successfully defeats Corona