दिघी बंदरात शेकडो नौका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

दिघी बंदरात शनिवार (ता. २१) रात्रीपासून शेकडो मोठमोठ्या मच्छीमारी नाैका विसाव्यासाठी आल्या आहेत.

श्रीवर्धन (बातमीदार) : दिघी बंदरात शनिवार (ता. २१) रात्रीपासून शेकडो मोठमोठ्या मच्छीमारी नाैका विसाव्यासाठी आल्या आहेत. त्या मुंबई, कर्नाटक, गुजरात आदी 
भागातील असल्याची माहिती दिघी रहिवाशांनी दिली. 

खोल समुद्रामध्ये दोन दिवसांपासून आलेल्या वादळामुळे दिशा चुकण्याच्या भीतीने या नौकांनी दिघी बंदरात आपला आसरा घेतला आहे.  त्यातील कर्मचाऱ्यांनी बर्फ, पिण्याचे पाणी, जेवणाचे साहित्य हे सर्व भरून घेतले. या नौका काही दिवस हवामानाचा अंदाज घेण्यासाठी या  बंदरात थांबून राहणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hundreds boat are in Dighi port