esakal | महामुंबईत साडे पाच लाख मजुरांची उपासमार
sakal

बोलून बातमी शोधा

महामुंबईत साडे पाच लाख मजुरांची उपासमार

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, भाईंदर, पालघर या शहरांत हातावर पोट भरणारे 5 लाख 57 हजार मजूर आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केल्याने त्यांची उपासमार सुरू झाली आहे.

महामुंबईत साडे पाच लाख मजुरांची उपासमार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई, ठाणे, नवी मुंबई, भाईंदर, पालघर या शहरांत हातावर पोट भरणारे 5 लाख 57 हजार मजूर आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केल्याने त्यांची उपासमार सुरू झाली आहे. कोणतीही मदत त्यांच्यापर्यंत पोचत नाही. उपजीविकेचे कोणतेही साधन आणि पर्याय नसल्याने त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा जगण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

ही बातमी वाचली का? कोरोनामुळे भाजी विक्रेत्यांचे फावले; भावात दुपटीने वाढ

बांधकाम, रस्त्यांची कामे, प्लंबिंग, बिगारी, रंगकाम, गाड्या धुणे, घरकाम अशी विविध प्रकारची हाताला मिळेल ती कामे करून मुंबईत आणि लगतच्या शहरात तब्बल 5 लाख 57 हजार लोक जगत आहेत. त्यांच्या कामाला कोणतीही प्रतिष्ठा नाही. रोज कमवायचे आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह असे हे श्रमिक दिवस ढकलत आहेत. कोरोनाचे असे संकट येईल याची त्यांना कल्पनाही नव्हती. संचारबंदी लागू केल्यामुळे त्यांचा रोजगार बंद झाला आहे. बाहेरची सर्वच छोटी-मोठी कामे बंद आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे कोणी कामे देत नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव होईल या भीतीने घरकाम करणाऱ्या मजुरांचीही कामे बंद झाली आहेत. गेल्या चार दिवसांपासून हे मजूर घरीच बसून आहेत. 

ही बातमी वाचली का? दारू मिळेना... म्हणून तळीराम लढवतायेत ही शक्कल 

गेल्या 2011 मध्ये झालेल्या जनगणनेनुसार मुंबईत 57 हजार 415 बेघर आहेत. त्यांचेही हातावर पोट आहे. मिळेल ते काम करून ते जगत आहेत. त्यातील काही टक्का दुष्काळी भागातून आलेला आहे. भारतीय सेवा नाका कामगार संघटनेने मुंबईत ठाणे पालघर, नवी मुंबई, भाईंदर आदी शहरातील नाका कामगार आणि हातावर पोट भरणाऱ्या मजुरांचे सर्वेक्षण केले आहे. त्यात त्यांना 6 लाख मजूर रोज हाताला मिळेल ते काम करीत असळताचे आढळून आले आहे. कोरोनामुळे लागू झालेल्या संचारबंदीच्या काळात या मजुरांची उपासमार सुरू झाली आहे. बेघर नागरिकांचीही उपासमार होत आहे. त्यांचाही सरकारने अशा परिस्थितीत सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना मदत करावी, अशी मागणी शेल्टर मोनिटरिंग कमिटीचे सदस्य ब्रिजेश मौर्य यांनी केली आहे. 

ही बातमी वाचली का?  ठाणे, नवी मुंबईत तीन कोरोना चाचणी केंद्र सुरु होणार

नाका कामगारांना ओळखपत्र देऊन त्यांना या अडचणीच्या काळात मदत करावी. त्यांची उपासमार थांबवावी. 
- ऍड. नरेश राठोड, भारतीय सेवा नाका कामगार संघटना.