उल्हासनगरमध्ये ओढणीने गळा आवळून पत्नीचा खून

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

दीपकला एक मुलगा आणि एक मुलगी असून, या हत्येने मुकुंदनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दीपक हा शांत स्वभावाचा असून त्याने एवढे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत परिसरात चर्चा आहे. सदर प्रकरणात आरोपी दीपक पगारे यास पोलिसांनी अटक केली असून उल्हासनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सावंत अधिक तपास करीत आहेत.

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये आज (रविवार) सकाळी पतीनेच पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची घटना समोर आली असून, शहरातील कॅम्प क्रमांक एक येथील मुकुंदनगरमध्ये ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, प्लम्बरचे काम करणारा दीपक पगारे हा रात्री कामावरून घरी आला. त्यानंतर त्याची पत्नी रेखा हिच्या बरोबर जोरात भांडण झाले. या भांडणात दीपकने रेखाचा ओढणीने गळा आवळून खून केला. दीपक हा रेखावर संशय घेत होता. त्यामुळे त्यांचे अनेकदा खटके उडायचे. या संशयाच्या भरात दीपकने आपल्या पत्नीचा खून केल्याचं समोर आले आहे.

दीपकला एक मुलगा आणि एक मुलगी असून, या खुनाने मुकुंदनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दीपक हा शांत स्वभावाचा असून त्याने एवढे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत परिसरात चर्चा आहे. सदर प्रकरणात आरोपी दीपक पगारे यास पोलिसांनी अटक केली असून उल्हासनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सावंत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: husband killed wife in Ulhasnagar