प्रियकराच्या मदतीने पतीचा खून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 जानेवारी 2019

ठाणे : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून करून अपघाताचा देखावा केल्याची घटना शनिवारी पहाटे घोडबंदर रोडमधील गायमुख येथे घडली. पतीच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करून नंतर त्या दोघांनी पलायन केल्याची घटना घडली. प्रिया नाईक असे तिचे नाव असून मृत पतीचे नाव गोपी आहे. 

घोडबंदर येथील गायमुख भागात श्रमसाफल्य या इमारतीत गोपी पत्नीसोबत राहत होता. त्याची पत्नी प्रियाचे महेश कराळेबरोबर अनैतिक संबंध होते. त्यात गोपी अडथळा ठरत असल्याने तिने प्रियकर महेश याच्या मदतीने रविवारी पहाटे त्याचा गळा दाबून आणि त्यांच्या डोक्‍यात अवजड वस्तूने प्रहार करून खून केला. त्यानंतर तिने मृतदेह महेशच्या दुचाकीवर बसवून जिल्हा रुग्णालयात नेला. तेथे अपघात झाल्याचे डॉक्‍टरांना सांगितले. नंतर ती महेशसोबत पळून गेली. हा सर्व प्रकार रुग्णालयातील सीसी टीव्हीत कैद झाला.

दरम्यान, अपघात नसून खून केला असल्याचे डॉक्‍टरांच्या लक्षात आले. तोपर्यंत ते दोघे पळून गेले होते. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ते आता पळून गेलेल्या पत्नीचा व तिच्या प्रियकराचा शोध घेत आहेत. 

Web Title: Husband Murder by wife with the help of a boyfriend