दोन दिवस पत्नीच्या मृतदेहासोबत

दोन दिवस पत्नीच्या मृतदेहासोबत

मुंबई - पत्नीची हत्या करून पती दोन दिवस मृतदेहाशेजारी बसून असल्याचा प्रकार शीव परिसरात घडला. अटकेच्या भीतीने आत्महत्येच्या प्रयत्नात दोन्ही हातांच्या नसा कापून घेतलेला पती रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या दाम्पत्याच्या घरातून दुर्गंधी आल्यावर शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. 

शीव येथील येथील प्रतीक्षा नगर परिसरातील शास्त्रीनगर येथे संजयकुमार भटेल पडिहारी (२९) पत्नीसह राहत होता. पत्नी त्याच्या दारू पिण्यास विरोध करत असल्यामुळे दोघांमध्ये नोव्हेंबर २०१८ पासून भांडणे सुरू होती. तो वेळोवेळी पत्नीला बेदम मारहाण करत असे. आजारी असूनही औषधे घेत नसल्याच्या कारणावरून त्याने २१ मे रोजी अमानुष मारहाण करून पत्नीचा खून केला. त्यानंतर दोन दिवस तो पत्नीच्या मृतदेहाशेजारी बसून होता. त्याने स्वतःच्या दोन्ही मनगटांच्या नसा ब्लेडने कापून आत्महत्येचा प्रयत्नही केला. त्याच्या पत्नीचा मृतदेह सडू लागल्यामुळे शेजाऱ्यांना दुर्गंधी आली. त्यांनी पाहिले असता, पत्नीच्या मृतदेहाजवळ पती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले. वडाळा टीटी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन दोघांना शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com