पती-पत्नी, मुलाची आत्महत्या?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

मुंबई - कफ परेड येथील एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह शुक्रवारी (ता. 22) सकाळी घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. पती, पत्नी व त्यांच्या 11 वर्षीय मुलाचे हे मृतदेह असून, त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे. काही दिवसांपूर्वी या कुटुंबातील मुलीचा मृत्यू झाल्यापासून हे कुटुंब तणावाखाली होते.

प्रवीण पटेल (वय 40), रिना पटेल (वय 35) व प्रभू पटेल (वय 11) अशी मृतांची नावे आहेत. पटेल राहत असलेले घर एका डेकोरेटरच्या मालकीचे असून त्याच्याकडेच ते कामाला होते. प्रवीण व रिना यांनी कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन लग्न केल्यामुळे त्यांचे नात्यातही कोणाशी संबंध नव्हते. त्यामुळे हे कुटुंब एकटे पडले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. त्यांनी शेजारच्यांशी बोलणे कमी केले होते.

त्याच तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे. शवविच्छेदन अहवाल अद्याप न आल्याने या दांपत्याने प्रथम मुलाची हत्या केली की त्यानेही गळफास घेतला, ही बाब स्पष्ट होऊ शकली नाही, असे पोलिसांनी सांगितले.

मच्छीमार नगर परिसरातील या घरातून शुक्रवारी दुपारी दुर्गंधी येऊ लागल्यामुळे स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता तिघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. हे मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त (परिमंडळ-1) मनोजकुमार शर्मा यांनी दिली.

"जगणे कठीण झालेय'
घटनास्थळी पोलिसांना चिठ्ठी सापडली असून, त्यात मुलीच्या मृत्यूमुळे आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. याशिवाय पैशांची चणचण होती व काही व्यक्ती टोमणे मारतात. त्यामुळे जगणे कठीण झाल्याचे या चिठ्ठीत नमूद केले आहे.

Web Title: Husband wife and son suicide hanging