दमदार परफॉर्मन्सची हस्कवर्ना भारतात 

file
file

मुंबई : दमदार परफॉर्मन्स आणि अनोखी स्वीडिश डिझाइन असा उत्कृष्ट मेळ असलेल्या बहुप्रतिक्षित हस्कवर्ना ट्विन्स या मोटरसायकलच्या भारतातील किमतींची घोषणा बजाज ऑटोने नुकतीच केली. 1.80 लाख रुपये (एक्‍स-शोरूम दिल्ली) इतकी या मोटरसायकल्सची किंमत ठेवण्यात आली आहे. स्वार्टपिलेन 250 आणि विटपिलेन 250 या मोटरसायकल्सचे गोव्यात 6 डिसेंबर 2019 रोजी झालेल्या इंडिया बाइक वीकमध्ये अनावरण करण्यात आले होते. हस्कवर्ना हा मूळचा स्वीडनमधील आघाडीचा प्रीमिअम मोटरसायकल ब्रॅंड आहे. केटीएम ग्रूपचा भाग असलेला हा ब्रॅंड केटीएम ब्रॅंडच्या दणदणीत यशाला जोड म्हणून बजाज ऑटोने भारतात आणला आहे. दिसायला अतिशय देखण्या या असणाऱ्या या मोटरसायकल ग्राहकांना भुरळ घालताना पहायला मिळत आहे.

हेही महत्वाचे...अनधिकृत फेरीवाल्यांना बसणार दणका 

केटीएम आणि हस्कवर्ना या दोन्ही ब्रॅंड्‌सच्या विक्रीसाठी नवे स्वरूप देण्यात आलेल्या केटीएम शोरूममध्ये हस्कवर्ना मोटरसायकल विक्रीसाठी उपलब्ध असतील. मार्चमध्ये 45 शहरांमधील 100 शोरूम्समध्ये या विक्रीला सुरुवात होईल. पुढील पाच महिन्यांच्या कालावधीत 275 शहरांमधील 400 केटीएम शोरूमपर्यंत ही व्याप्ती वाढवली जाणार आहे. हस्कवर्ना स्वार्टपिलेन आणि विटपिलेन मध्ये खास स्वीडन डिझाइन आहे. असे खास डिझाइन जे फारसे भपकेदार नाही, किमान डिझाइन, अभिजातता असलेले आणि त्यामुळेच प्रिमीअम मोटरसायकल विभागात ही मोटरबाइक अत्यंत वेगळी आणि अनोखी ठरते.

स्वार्टपिलेन 250 मध्ये अधिक कणखर डिझाइन आहे आणि यात चालकाचे शरीर सरळ ताठ राहते. यात ड्युएल पर्पझ टायर्स आहेत आणि हमरस्त्यावर तसेच आडवाटेवरील प्रवासासाठी हा उत्तम पर्याय ठरतो. विटपिलेन 250 मध्ये अधिक स्पोर्टी डिझाइन, हॅंडलबार्सवर क्‍लिप्स आणि पुढे झुकलेली रायडिंग स्थिती अशी वैशिष्ट्ये आहेत. 

इंजिन 
या 250 सीसी बाइकमध्ये फ्युएल इंजेक्‍टेड, लिक्विड कुल्ड, सिंगल सिलेंडर, 4-स्ट्रोक डीओएचसी इंजिन आहे. हे इंजिन प्रचंड प्रमाणातील इंजिन रीफाइनमेंटमधून प्रचंड टॉर्क निर्माण करत बाइक चालवण्याचा दमदार आणि आनंददायी अनुभव देते. यातील कॉम्पॅक्‍ट चासिस डिझाइन, डब्ल्यूपी सस्पेंशन आणि प्रीमिअम दर्जाच्या घटकांमुळे हस्कवर्ना ट्विन्समधून दमदार परफॉर्मन्स आणि बाइक चालवण्याचा उत्कृष्ट अनुभव मिळण्याची खातरजमा होते. 

उत्कृष्ट मेळ 
दमदार परफॉर्मन्स आणि अनोखी स्वीडिश डिझाइन असा उत्कृष्ट मेळ यात आहे. हस्कवर्नाची निर्मितीच मुळात अभिजात आवड, स्टाइलची दमदार जाण असलेल्या आणि परफॉर्मन्स आणि अभिजात डिझाइनमध्ये तडजोड न करणाऱ्या प्रगतीशील रायडर्ससाठी करण्यात आली आहे. एका वेगळ्या आणि सुयोग्य ग्राहकविभागाला आकर्षित करत हस्कवर्ना केटीएम मोटरसायकलच्या यशाची पुनरावृत्ती करतील, अशी आम्हाला आशा आहे, असे कंपनीने म्हटलेले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com