"हैदराबाद स्फोटाचा योग्य तपास नाही'

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 19 एप्रिल 2018

मुंबई - 'हैदराबाद येथील मक्‍का मशीदीत 2007 मध्ये बॉम्बस्फोट झाला तो कोणी केल्याशिवाय झाला का? राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून याबाबत योग्य दिशेने शोध न झाल्यानेच गुन्हेगारांना शिक्षा झाली नाही, '' असा आरोप समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी आज केला.

समाजवादी पक्षाच्या पत्रकार परिषदेत आझमी यांनी "भगव्या ब्रिगेड' बाबत तपास यंत्रणा सौम्यपणे वागत असल्याचे निरीक्षण नोंदवले. उन्नाव येथील बलात्कारात भाजपच्या आमदाराचा सहभाग होता. त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. कथुआमध्ये बलात्काऱ्यांची बाजू घेण्यासाठी वकिलांचे सुरू असलेले आंदोलन आणि अहमदाबादमध्ये बाबू बजरंगीला सरकारच्या मदतीनेच जामिन मिळाला असल्याकडे आझमी यांनी लक्ष वेधले.

Web Title: hyderabad blast inquiry abu azmi