esakal | पेट्रोल- डिझेलपेक्षा तिपटीने ​प्रभावी असणार हायड्रोजन इंधन : IIT MUMBAI
sakal

बोलून बातमी शोधा

petrol diesel

पेट्रोल- डिझेलपेक्षा तिपटीने प्रभावी असणार हायड्रोजन इंधन : IIT MUMBAI

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : मागील काही वर्षात देशात पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol And Diesel) किंमती गगनाला भिडलेल्या (Petrol diesel price up) असतानाच यातून देशातील नागरिकांना स्वस्त आणि पर्यावरणपूरक अशा इंधनाचा पर्याय आआयटी मुंबईतील (IIT Mumbai) संशोधकांनी शोधला आहे. चुंबकाच्या सहाय्याने पाण्यातून हायड्रोजन इंधन (Hydrogen Fuel) तयार करण्याचे एक सेटअप यावेळी आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी (IIT Scientist) तयार केले आहे. पेट्रोल आणि डिझेलपेक्षा तब्बल तीन पट अधिक प्रभावी असे हायड्रोजन इंधन असल्याचे आयआयटीतील संशोधकांनी सांगितले. (Hydrogen fuel an option for petrol diesel fuel)

आयआयटी मुंबईच्या संशोधक टीमकडून एका प्रयोगातून सिद्ध केले आहे की, चुंबकीय पद्धत वापरून पाण्यातून स्वस्त दरात हायड्रोजन इंधनाची निर्मिती करण्यात येऊ शकते. संशोधकांनी दोन इलेक्ट्रोरॉड वापरून पाण्यातून विद्युत् सोडण्यात आले आणि पाण्यातून हायड्रोजन वेगळे करण्यात आले. त्याचप्रमाणे यासाठी संशोधकणाकडून प्लैटिनम, रोडियम आणि इरिडियम अशा वापरण्यात येणाऱ्या विविध धातूंची किंमत जास्त आहे. त्यामुळे या हायड्रोजन निर्मितीची पद्धत खर्चीक असू शकते. मात्र आयआयटीच्या संशोधकांनी कॉपर, आयरन, निकल आणि चुंबकीय पद्धत वापरून तीन पट जास्त प्रमाणात पाण्यातून हायड्रोजन इंधन तयार केले आहे. येणाऱ्या काळात सीएनजी, पेट्रोल, डिझेल यांना पर्याय देण्यासाठी हायड्रोजन तयार करण्यासाठी या सोप्या आणि स्वस्त पद्धतीचा वापर करुन आपन सामान्य नागरिकांना दिलासा देऊ शकतो असा विश्वास आयआयटी संशोधक टीमचे प्रमुख प्राध्यापक चंद्रमौली सुब्रमणियम यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा: डिसेंबर २०२२ पर्यंत मुंबई- गोवा महामार्गाचे चौपदरीकरण होणार पूर्ण : PWD

पाण्यापासून तयार केल्‍या जाणाऱ्या हायड्रोजन इंधनामुळे देशात येत्या काळात मोठी मागणी वाढेल आणि इतर इंधनामुळे होणाऱ्या पर्यावरणाचा ऱ्हासही थांबेल असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे. हायड्रोजन इंधन पर्यावरण पूरक असून पेट्रोल - डिझेलच्या तुलनेत तीनपट जास्त प्रभावी आहे. हायड्रोजन इंधनचे स्त्रोत खुप कमी प्रमाणात आहे. त्यामुळे पाण्यातून या इंधनची निर्मिती करण्यात येते. काही केमिकल पद्धतीचा वापर करुन हायड्रोजनची निर्मिती करण्यात येते. पेट्रोल - डिझेलला पर्याय म्हणून हायड्रोजन इंधनाकडे पाहण्यात येईल असेही सांगण्यात आले

loading image