बाबासाहेबांमुळे मी इथपर्यंत पोहोचलो - मंत्री विष्णू सवरा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

वाडा : बाबासाहेबांचे दिन-दलित व उपेक्षित समाजावर अनंत उपकार असून त्यांनी दिलेल्या संविधानिक अधिकारामुळेच माझ्यासारख्या अतिसामान्य कुटुंबातील व्यक्तीला राज्याच्या मंत्रिपदाचा मान मिळाला, असे कृतज्ञतापूर्वक उद्गार राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णुजी सवरा यांनी आज वाडा येथे बोलताना काढले.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीच्या निमित्ताने वाड्यातील सिद्धार्थ नगर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलतांना विष्णूजी सवरा यांनी बाबासाहेबांना अपेक्षित असणारा भारत घडविण्यासाठी केंद्र व राज्यातील भाजपा सरकार कटिबद्ध असून दीन-दलितांसाठी असणाऱ्या विकासाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

यावेळीं भाजपाचे तालुका अध्यक्ष संदीप पवार, वाडा नगरपंचायतच्या नगराध्यक्ष गीतांजली कोळेकर, नगरपंचायत भाजपा गटनेते मनीष देहरकर, नगरपंचायत स्वछता समिती सभापती राम जाधव, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र थोरात यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Web Title: i am reached over here because of babasaheb ambedkar