योगामुळे पंतप्रधान पदाची जबाबदारी सांभाळू शकलो : जपानचे माजी पंतप्रधान

संजीत वायंगणकर
मंगळवार, 26 जून 2018

डोंबिवली : ''आपल्या समोरची ही भावी पिढी आपल्या स्वतःसह आपला समाज, देश व संपूर्ण जगाला नक्कीच शांततामय बनवेल याबद्दल मला खात्री आहे. ट्रान्सडेंटल मेडिटेशन, सिध्दि व योगिक फ्लाईंग याच्या जोरावर आपण कठिणात कठिण ध्येय साध्य करु शकतो. आयुष्यातील सर्व ताणतणाव दूर सारुन आपल्या अंतर्मनात निर्माण होणारी उर्जाच आपल्याला यश मिळवून देते.'', असे प्रतिपादन जपानचे माजी पंतप्रधान युकिओ हातोयामा यांनी केले. 

महर्षि महेश योगी यांच्या महर्षि जागतिक शांतता प्रकल्पा अंतर्गत हातोयामा हे जगभर ट्रान्सडेंटल मेडिटेशन या मूळ भारतीय परंतु आता जगाने मान्य केलेल्या योग ध्यान धारणा शास्त्राचा प्रचार व प्रसार करीत आहेत. त्यानुसार मंगळवारी ते डोंबिवलीत आले होते.डोंबिवलीतील वैशालीताई जोंधळे विद्यासमूहातर्फे गेल्या दोन वर्षांपासून जगभरातल्या अनेक मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने मेडिटेशन व फ्लाईंग योगा सर्व विद्यार्थी व शिक्षकांना शिकविण्यात येत आहे.त्यामुळे त्यांच्यात अमूलाग्र बदल दिसून येत आहेत. सुमारे दोनशे विद्यार्थ्यांनी ध्यानधारणा करुन पाहुणे व मान्यवरांसमोर फ्लाईंग योगाची प्रात्यक्षिके दाखविली. त्यानंतर मार्गदर्शन करताना हातोयामा बोलत होते. 

माझे वय 71 असून मी गेल्या तीस वर्षांपासून ट्रान्सडेंटल मेडिटेशन सातत्याने करतो या योगामुळे पंतप्रधान पदाची जबाबदारी मी सहज सांभाळू शकलो व आजही ताजातवानाव उत्साही आहे. या योगाच्या माध्यमातूनच आपल्याला या विश्वात शांती प्रस्थापित करायची आहे असे ते म्हणाले. या प्रसंगी व्यासपिठावर युकिओ हातोयामा त्यांच्या पत्नी मियुकी ,लंडचे जेन हा कसन , संजय चेऊलकर, विद्यासमूहाच्या प्रमुख वैशालीताई जोंधळे,सागर जोंधळे,देवेंद्र जोंधळे, चौधरी, महर्षि इन्स्टिट्युट फ एज्युकेशन जपानचे टाकू कोबायाशी,डायसुके हागा आदि मान्यवर उपस्थित होते. श्वेता जोंधळे यांच्या पुढाकाराने सुरु झालेल्या योगासाधनेमुळे यंदा दहावीचा निकाल शंभर टक्के असून विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गुणांमध्ये वाढ झाली आहे.प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये होणारा सकारात्मक बदलच हळूहळू समाज परिवर्तन करेल व सर्वत्र शांती नांदेल अशी आशा वैशालीताई जोंधळे यांनी व्यक्त केली. 

Web Title: I could easily manage the responsibilities of Yoga said Former Japanese Prime Minister Yukio Hatoyama