मला शिवसेनेची ऑफर होती - राणे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

मुंबई - शिवसेना मी सोडली नव्हती; तर मला सोडायला लावली. बाळासाहेबांच्या मनात माझ्याविषयी गैरसमज निर्माण केले गेले. माझ्यामुळे कुटुंबात वाद नको म्हणून मी शिवसेना सोडली; मात्र कॉंग्रेस सोडल्यानंतर मला शिवसेनेने ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष व खासदार नारायण राणे यांनी गुरुवारी केला. 

वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात झालेल्या मेळाव्यात राणे बोलत होते. या वेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे मुंबई अध्यक्ष म्हणून राजेश हाटले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. राणे या वेळी म्हणाले, की कॉंग्रेसमध्ये 12 वर्षे राहिलो. या कालावधीत मला तीन वेळा सोनिया गांधी यांच्याकडे बोलावण्यात आले. मुख्यमंत्री करतो, असे सांगितले. अहमद पटेल यांनीही सहा महिन्यांत मुख्यमंत्री करतो, असे आश्‍वासन दिले होते. एकदा तर मी मुख्यमंत्री झालो म्हणून सगळ्यांनी अभिनंदनही केले होते. मला जास्त आमदारांची पसंती होती; तरी अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री केले. सत्ता घालवणाऱ्यांना मुख्यमंत्री केले. मग मी कॉंग्रेसमध्ये का राहावे? काही जण म्हणतात, राणे साहेब उतावीळ होऊन पक्ष का सोडतात? यावर चर्चा होतात; पण मी कुठल्याही प्रकारची घाई करीत नाही. जे माझ्यावर लिहितात, ते माझ्यापेक्षा कनिष्ठ असावेत. आज शिवसेनेत किंवा राज्याच्या एकूण राजकारणात माझ्याएवढी पदे कोणालाही मिळाली नाहीत, असेही राणे या वेळी म्हणाले. शिवसेनेचे मंत्री म्हणतात आम्ही युती तोडतो; पण कधी हे सांगत नाहीत. सगळी जबाबदारी भाजपच घेणार; मग शिवसेनेची काय फक्त खायची जबाबदारी आहे का, असा सवालही राणेंनी या वेळी केला. 

Web Title: I had a Shiv Sena's offer says Narayan Rane