चॅनल माझ्या आवडीचे स्वातंत्र्य मला निवडीचे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 डिसेंबर 2018

मुंबई : सर्व दूरदर्शन वाहिन्यांची ट्राय ने जारी केलेली दरपत्रिका व संबंधित सेवापुरवठादारांचे संपर्क क्रमांक मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे नागरिकांना कळवून त्यांना हवी ती वाहिनी निवडण्यास साह्य करण्याची मोहिम हाती घेतली आहे.  

दूरदर्शन ग्राहकांना आपल्याला हव्या त्याच वाहिन्या निवडीचे स्वातंत्र्य दूरसंचार नियामक आयोगाने (ट्राय) नुकतेच दिले आहे. या पार्श्वभूमीवर 24 डिसेंबर या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्ताने ग्राहक पंचायतीने हा उपक्रम सुरु केल्याची माहिती पंचायतीने कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी दिली. 

ग्राहक संरक्षण कायद्याने ग्राहकाला निवडीचा हक्क दिला आहे. त्यामुळे ट्राय ने ग्राहकांना टिव्हीवरील आपल्याला हव्या तेवढ्याच वाहिन्यांची निवड करुन त्यांची नावे आपल्या केबल सेवा वा डीटीएच सेवा पुरवठादाराला कळवण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. तसे आदेशच ट्राय ने सेवा पुरवठादारांना दिले आहेत. आजवर केबल व डीटीएच सेवा पुरवठादार ग्राहकांना नको असलेल्या वाहिन्यासुद्धा त्यांच्या माथी मारुन भरमसाठ पैसे वसुल करत होते. ट्रायने या अनिष्ट प्रथेला आता चाप लावला आहे. 

त्यानुसार ग्राहकांनी आता आपल्याला हव्या असलेल्या वाहिन्यांची नावे आपल्या केबल वा डीटीएच  सेवा पुरवठादाराला 29 डिसेंबर पर्यंत कळवणे आवश्यक आहे. त्यामुळे राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधत 24 ते 29 डिसेंबर या कालावधीत मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे समाजमाध्यमांमार्फत ग्राहकांना या सर्व वाहिन्यांची ट्रायने निश्चित केलेली दरपत्रिका व संबंधित सेवा पुरवठादारांचे संपर्क क्रमांक कळवीत असून आपला वाहिनी निवडीचा हक्क बजावण्याचे आवाहन करीत आहे.

Web Title: i have to right to select my favorite Chanel