फडणवीसांच्या भेटीबद्दल उद्धव ठाकरेंना कल्पना होतीः संजय राऊत

पूजा विचारे
Sunday, 27 September 2020

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी मुंबईत बीकेसीमधील सॉफिटेल हॉटेलमध्ये भेट झाली. स्वतः संजय राऊत यांनी या भेटीमागचं कारण सांगितलं आहे. 

मुंबईः शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी मुंबईत बीकेसीमधील सॉफिटेल हॉटेलमध्ये भेट झाली.  शनिवारी दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास उभय नेत्यांमध्ये ही भेट झाली. या भेटीनंतर अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. दरम्यान या भेटीमागचं कारण समोर आलं आहे. स्वतः संजय राऊत यांनी या भेटीमागचं कारण सांगितलं आहे. 

सामनाच्या मुलाखतीसंदर्भात फडणवीसांची भेट घेतल्याचं सांगत ही भेट गुप्त नव्हती, असं राऊतांनी स्पष्ट केलं आहे.  सामनाच्या मुलाखतीसाठी देवेंद्र फडणीस यांना बऱ्याच दिवसांपासून भेटण्याचा विचार होता. शनिवारी आम्ही भेटल्यानंतर गप्पा मारल्या त्यानंतर आम्ही एकत्र जेवण केले, असंही त्यांनी सांगितलं. 

आमच्यात वैचारिक मतभेद असू शकतात पण आम्ही शत्रू नाही. फडणवीस यांची भेट ही गुप्तपणे मुळीच नव्हती.  मुळात महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत कुणीही कुणाचे शत्रू नाही.  आमच्या या भेटीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्पना होती, असंही राऊत म्हणालेत. याआधीही शरद पवार यांचीही मुलाखत घेण्याचा विचार होता. पण कोरोनाच्या काळामुळे शक्य झाली नाही, असेही राऊत म्हणाले.

तसंच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. उद्धव टाकरेही मोदींना आपला नेता मानतात आणि मी सुद्धा त्यांन मानतो, असे वक्तव्य राऊत यांनी केले आहे. 

मी देवेंद्र फडणवीस यांना भेटणं काय अपराध आहे का? देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. राज्यातील दोन वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी भेटणं म्हणजे अपराध नाही आहे. मुळात ती गुप्त भेट नव्हती, जाहीरपणे आम्ही भेटलो.  दोन वेगवेगळ्या पक्षाचे नेते भेटू शकतात. चर्चा करू शकतात. शरद पवार यांची मुलाखत घेतली होती, तेव्हाच आपण देवेंद्र फडणवीस, राहुल गांधी आणि अमित शाह यांचीही मुलाखत घेणार असल्याचं जाहीर केलं होतं, असंही संजय राऊत यांना सांगितलं.

I met Devendra Fadnavis CM was aware about our meeting Sanjay Raut Shiv Sena


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I met Devendra Fadnavis CM was aware about our meeting Sanjay Raut Shiv Sena