आत्महत्येच्या विचाराने ग्रासले होते! - ए. आर. रेहमान

आत्महत्येच्या विचाराने ग्रासले होते! - ए. आर. रेहमान

मुंबई - अपयशामुळे वयाच्या पंचविशीपर्यंत जवळजवळ दररोज माझ्या मनात आत्महत्येचे विचार येत होते, अशी प्रांजळ कबुली ‘ऑस्कर’ विजेते प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांनी दिली. 

रेहमान यांच्या अंगी असलेल्या सांगीतिक गुणांची जगाने दखल घेतल्यानंतर त्यांच्या वाट्याला अमाप प्रसिद्धी आली असली तरी करिअरच्या सुरवातीचा काळ आपल्यासाठी अतिशय खडतर होता, असेही या प्रख्यात संगीतकाराने स्पष्ट केले. वयाच्या पंचविशीपर्यंचा काळ माझ्यासाठी आव्हानात्मक होता. मात्र, या वाईट अनुभवांनीच मला धाडसी बनविल्याचे प्रतिपादन रेहमान यांनी केले. कृष्ण त्रिलोक यांनी लिहिलेल्या रेहमान यांच्या चरित्राचे प्रकाशन येथे शनिवारी आयोजित कार्यक्रमात झाले. त्या वेळी रेहमान यांनी आपल्या वाट्याला आलेल्या संघर्षाच्या काळावर प्रकाशझोत टाकला. ‘नोट्‌स ऑफ ड्रिम ः द ऑथोराईज्ड बायोग्राफी ऑफ ए. आर. रेहमान’ असे या पुस्तकाचे नाव आहे. रेहमान हे अवघ्या नऊ वर्षांचे होते, त्या वेळी त्यांचे वडील आर. के. शेखर यांचे निधन झाले. रेहमान यांचे वडील हेही संगीत संयोजक होते. त्यानंतर वडिलांची संगीत वाद्ये रेहमान यांच्या कुंटुंबीयांना भाड्याने देणे भाग पडले. रेहमान यांचा संगीत क्षेत्रातील प्रवास अगदी लहान वयात सुरू झाला.  

याबाबत पीटीआयशी बोलताना रेहमान म्हणाले, ‘‘मृत्यू हा कोणालाही चुकलेला नाही. त्यामुळे त्याला घाबरण्याचे कारण नाही, हे मी लहान असतानाच शिकलो. त्यानंतर मी सुफी ईस्लामकडे वळलो. भूतकाळातील ओझे मागे टाकत दिलीपकुमारचा ए. आर. रेहमान बनलो.’’ त्यानंतरचा त्यांचा प्रवास सर्वांनाच ज्ञात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com