Actress Ketki Chitale released from jail
Actress Ketki Chitale released from jailActress Ketki Chitale released from jail

त्यांनी माझा विनयभंग केला, केतकी चितळेचा गंभीर आरोप

शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकीवर अटकेची कारवाई झाली होती.

मुंबई : राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टिपण्णी करणारी अभिनेत्री केतकी चितळे ही अटक होऊन जामीनावर सुटकाही झाली आहे. पण पोलीस कोठडीत आपल्याला अनेक गंभीर गोष्टींचा सामना करावा लागला असा आरोप तिनं नुकताच केला आहे. इंडिया टुडेशी बोलताना तिनं आपल्या मारहाण विनयभंग झाल्याचं म्हटलं आहे. (I was hit molested unlawfully jailed says Marathi actor Ketaki Chitale)

Actress Ketki Chitale released from jail
फडणवीसांनी स्विकारला उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार; ओबीसी आरक्षणावर घेतली बैठक

केतकी म्हणाली, तुरुंगात असताना मला मजबूत राहण गरजेचं होतं. कारण, एकतर मला बेकायदा पद्धतीनं माझ्या घरातून ताब्यात घेण्यात आलं. बेकायदापद्धतीनं कुठलंही वॉरंट, नोटीस न देता मला तुरुंगात डांबण्यात आलं. पण मला माहिती होतं की, मी काहीही चुकीचं केलेलं नाही त्यामुळं मी या सर्व गोष्टींना सामोर जाणार. पण पोलीस कोठडीदरम्यान, माझा विनयभंग झाला, मला मारहाण झाली. तसेच काही तरुणांनी माझ्या अंगावर विषारी काळा रंग टाकला. कळंबोली पोलिसांकडून ठाणे पोलिसांकडे सुपूर्द करत असताना हा प्रकार घडला.

Actress Ketki Chitale released from jail
विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राहुल नार्वेकरांना उमेदवारी

अशा प्रकारच्या अनेक अत्याचाराच्या घटना माझ्यासोबत घडल्या, अशा प्रकारे भारतात बेकायदा पद्धतीनं अत्याचार करण्यात येत असल्याचंही तिनं आरोप करताना म्हटलं आहे. पण इतकं सोसल्यानंतरही मी हसत बाहेर आले कारण मी तुरुंगातून बाहेर आले होते, पण मी केवळ जामिनावर बाहेर आले आहे, हे लक्षात घ्यायला हवं. माझी लढाई अजून संपलेली नाही.

Actress Ketki Chitale released from jail
आरे कारशेडच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंचं सरकारला भावनिक आवाहन

केतकी चितळे २९ दिवस पोलीस कोठडीत होती. तिच्यावर राज्यात विविध पोलीस स्टेशनमध्ये २२ एफआयआर दाखल करण्यात आले होते. यांपैकी एका गुन्ह्यातून तिला जामीन मिळाला आहे, अद्याप इतर २१ गुन्हे कायम असल्याचं तिनं स्वतः यावेळी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com