‘आयएनएस बेतवा’ लवकरच पुन्हा सेवेत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

मुंबई - नौदलाच्या पश्‍चिम तळाची ताकद असलेली अपघातग्रस्त ‘आयएएन बेतवा’ युद्धनौका लवकरच पुन्हा सेवेत येणार आहे. नौदलाने कोट्यवधी रुपये खर्च करून या युद्धनौकेची डागडुजी केली आहे. या युद्धनौकेला अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज केले जाणार आहे. 

मुंबई - नौदलाच्या पश्‍चिम तळाची ताकद असलेली अपघातग्रस्त ‘आयएएन बेतवा’ युद्धनौका लवकरच पुन्हा सेवेत येणार आहे. नौदलाने कोट्यवधी रुपये खर्च करून या युद्धनौकेची डागडुजी केली आहे. या युद्धनौकेला अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज केले जाणार आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

नौदल दिनानिमित्त सोमवारी (ता. ३) मुंबई बंदरात नांगरलेल्या या युद्धनौकेवर झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. ‘आयएनएस बेतवा’ युद्धनौकेला २०१४ मध्ये एका जहाजाची धडक बसली होती. त्यामुळे एका भागाला भेगा पडल्या होत्या. ही युद्धनौका २०१६ ऑक्‍टोबरमध्ये डागडुजीसाठी मुंबई बंदरात आली होती. नौदलाच्या क्रुझर ग्रेव्हिंग सुक्‍या गोदीत डागडुजीचे काम सुरू होते. तळातील डागडुजी पूर्ण झाल्यावर समुद्रात सोडत असताना युद्धनौका घसरली. त्या दुर्घटनेत दोन नौसैनिकाचा मृत्यू झाला आणि १४ जण जखमी झाले होते. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा आदेश नौदलाने दिला होता. ही युद्धनौका २०१९ मध्ये पुन्हा नौदलाच्या सेवेत दाखल होईल, असे सांगण्यात आले.

मुंबईत सुक्‍या गोदीची नितांत गरज आहे. आणीबाणीच्या वेळी युद्धनौकेची सुक्‍या गोदीत तातडीने डागडुजी करणे शक्‍य होईल, असे नौदलाचे पश्‍चिम तटाचे प्रमुख गिरीश लुथ्रा म्हणाले.

नौदलात महिलांना प्रवेश देण्याचा विचार
नौदलात महिलांना प्रवेश देण्याबाबत विचार सुरू आहे. त्यासाठी अतिरिक्त कक्ष निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असे सांगण्यात आले. नौसैनिकांसाठी विशेष प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात येणार आहे.

‘आयएनएस बेतवा’ 
    नौदलाच्या ताफ्यात
२००४ मध्ये दाखल
    ‘ब्रह्मपुत्रा’ वर्गातील युद्धनौका
    वजन ३८०० टन, लांबी १२५ मीटर
    ताशी ३० सागरी मैल वेगाने प्रवास करण्याची क्षमता
    क्षेपणास्त्र हल्लाविरोधी यंत्रणा

Web Title: IAN Betwa warship will soon be in service