इब्राहिम कासकर याची पुन्हा तुरुंगात रवानगी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

मुंबई - खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इब्राहिम कासकर (वय 56) याला काल रात्री सव्वादहाला ठाणे सेंट्रल जेल येथून छातीत दुखत असल्याच्या तक्रारीमुळे जेजे रुग्णालयात तपासणीसाठी आणले होते. डॉक्‍टरांनी कासकर याची तपासणी करीत औषधोपचार केले. रुग्णाची शारीरिक स्थिती उत्तम असल्याने त्यांना परत मंगळवारी पहाटे 3 वाजता जेल पोलिसांनी ठाण्याला नेले. या संदर्भातील माहिती जेजे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी दिली.

मुंबई - खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इब्राहिम कासकर (वय 56) याला काल रात्री सव्वादहाला ठाणे सेंट्रल जेल येथून छातीत दुखत असल्याच्या तक्रारीमुळे जेजे रुग्णालयात तपासणीसाठी आणले होते. डॉक्‍टरांनी कासकर याची तपासणी करीत औषधोपचार केले. रुग्णाची शारीरिक स्थिती उत्तम असल्याने त्यांना परत मंगळवारी पहाटे 3 वाजता जेल पोलिसांनी ठाण्याला नेले. या संदर्भातील माहिती जेजे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी दिली. रमजानच्या काळात आपल्या कुटुंबीयांसोबत काही क्षण घालवावेत या उद्देशाने तर छातीत दुखत असल्याचा बहाणा इब्राहिम कासकरने केला तर नसावा ना, अशी चर्चा डोंगरी, मदनपुरा, मोहंमद अली रोड, आग्रीपाडा येथे सुरू आहे. कारण दाऊदचे कुटुंब या भागात वास्तव्यास आहे. 

Web Title: Ibrahim Kaskar again in jail