एफडीएकडून आईस्क्रीमची तपासणी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

मुंबई - वाढत्या उकाड्यामुळे हैराण झालेले नागरिक थोडासा गारवा मिळवण्यासाठी शीतपेयांचा आधार घेतात. काही विक्रेत्यांकडून शरीराला अपायकारक शीतपेयांची विक्री होत आहे. त्यांच्याविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) विशेष मोहीम हाती घेतली आहे. बर्फ, शीतपेयासह आईस्क्रीमचे सुमारे 37 संशयास्पद नमुने एफडीएने घेतले असून, ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल मिळताच संबंधित विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार आहे. 

शीतपेय तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी दूषित असल्यास नागरिकांच्या आरोग्याला ते धोकादायक ठरू शकते. शीतपेय बनवण्याच्या ठिकाणी स्वच्छता राखणे आवश्‍यक आहे. त्यानुसार एफडीएने शीतपेय तपासणीची मोहीम हाती घेतली आहे. शहर आणि उपनगरांतील विविध ठिकाणी बर्फ, शीतपेय आणि आईस्क्रीमचे संशयास्पद नमुने एफडीएने ताब्यात घेतले आहेत. कारखान्यांत दूषित पाण्यापासून बनवण्यात येणारा बर्फ ताब्यात घेऊन त्याची विल्हेवाट लावण्यात आली. बर्फाच्या सुमारे सहा कारखान्यांतील संशयास्पद नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. पेप्सी, थम्स अप आणि आईस्क्रीमचे सुमारे 37 नमुने एफडीएने घेतले. 

Web Title: Ice cream check by FDA