ऐन उन्हाळ्याच्या हंगामात आईस्क्रिम 'वितळलं', व्यवसायिकांचे कोट्यावधीचे नुकसान

IceCream
IceCream

महाड : रायगड जिल्ह्यातील कडक उन्हाळ्यात व्यापाऱ्यांना हमखास उत्पन्न मिळवून देणारा थंडपेय व आईस्क्रीमचा व्यवसाय यंदा टाळेबंदीमुळे उन्हाळ्याच्या हंगामातही बंद आहे. यामुळे रायगड जिल्ह्यातील सुमारे साडे आठशे व्यवसायिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये एप्रिल व मे महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटन व्यवसायाला चालना मिळते. या काळामध्ये विविध प्रकारचे आईस्क्रीम, अनेक थंडपेये, शरबत तसेच ऊसाचा रस व्यवसाय चांगला तेजीत असतो. मात्र सध्या सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजवला असताना या काळात थंड पदार्थांपासून लांब राहण्याच्या सूचनाही प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे आईस्क्रिम व थंडपेय विक्रेत्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे. याचा एकट्या रायगड जिल्ह्यातील सुमारे साडेआठशे व्यावसायिकांना कोट्यावधींचा फटका बसला आहे. पर्यटन व्यवसाय ठप्प झाल्याने उन्हाळ्यामध्ये थंड पदार्थांचे विक्री करणारे व्यवसाय देखील गारठले आहेत.

कोरोना आणि टाळेबंदीमुळे पर्यटन व्यवसाय ठप्प पडला आहे. त्यातच यंदा लग्नसोहऴे व कार्यक्रमही रद्द झाल्यामुळे थंडपेय व आईस्क्रिमचा व्यवसाय साफ नुकसानीत गेला आहे. जे व्यापारी केवळ याच व्यवसायावर अवलंबून आहेत, त्यांची अवस्था बिकट झाली आहे.
- संजय भातखंडे, व्यावसायिक

Ice cream melted during the summer season, read detail story 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com