सर्वात मोठी बातमी - आता मुंबई पुण्यात ‘पुल टेस्टींग’ आणि ‘प्लाझ्मा थेरपीला’ होणार सुरवात, स्वतः टोपेंचं ट्विट पहा काय म्हणतंय 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 24 एप्रिल 2020

कोरोना उपचारासाठी महाराष्ट्रात पुल टेस्टींग आणि प्लाझ्मा थेरपी उपचाराला केंद्रीय आरोग्यमंत्र्याकडून आज मान्यता मिळाली. त्यामुळे  ‘पुल टेस्टींग’ आणि ‘प्लाझ्मा थेरपी’चा मार्ग आता मोकळा झाला आहे

मुंबई, ता. 24 : कोरोना उपचारासाठी महाराष्ट्रात पुल टेस्टींग आणि प्लाझ्मा थेरपी उपचाराला केंद्रीय आरोग्यमंत्र्याकडून आज मान्यता मिळाली. त्यामुळे  ‘पुल टेस्टींग’ आणि ‘प्लाझ्मा थेरपी’चा मार्ग आता मोकळा झाला आहे. कोरोना प्रतिबंधाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज दुपारी देशातले सर्व आरोग्यमंत्री व सचिवांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. 

 

राज्य शासनाकडून मागणी करण्यात आलेल्या पूल टेस्टींग व प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धतीला मान्यता दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत महाराष्ट्राकडून मांडण्यात आलेल्या पोर्टेबल पल्स ऑक्सीमीटर व एक्सरे चाचणीच्या मदतीने कोरोना रुग्णाचे लवकर निदान करणे शक्य होईल आणि त्यातून मृत्यूदर कमी करता येऊ शकेल, असा मुद्दा मांडण्यात आला.

केंद्रीय  बैठकांनंतर मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिलेत 'हे' अत्यंत महत्त्वाचे निर्देश...

त्याचबरोबर पीपीई कीटचे निर्जंतुकीकरण करून त्याचे पुर्नवापर करण्यासाठी मुद्दे सुचविण्यात आले. त्याचे विशेष कौतुक यावेळी करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोरोना चाचणी सुरू करण्याच्या मागणीला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.

ICMR gave permission to conduct pool testing and plasma therapy in maharashtra  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ICMR gave permission to conduct pool testing and plasma therapy in maharashtra