
गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या बोरीवलीच्या भगवती रुग्णालयाचा अतिदक्षता विभाग सोमवारपासून सुरु करण्यात येणार आहे. यासंदर्भात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या मागणीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्यावर महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी तसे आदेश दिले.
मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या बोरीवलीच्या भगवती रुग्णालयाचा अतिदक्षता विभाग सोमवारपासून सुरु करण्यात येणार आहे. यासंदर्भात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या मागणीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्यावर महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी तसे आदेश दिले. त्यामुळे कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सौरव गांगुलीचे बंगाली खेळाडूंच बक्षिसाच्या रक्कमेपासून वंचित; वाचा सविस्तर...
दरम्यान, आज प्रवीण दरेकर यांच्यासह आमदार मनीषा चौधरी, नगरसेवक हरीष छेडा, माजी नगरसेवक प्रकाश दरेकर आदींनी पालिका आरोग्य अधिकाऱ्यांसह या रुग्णालयाची पहाणी केली. आयसीयूमधील खाटांची संख्याही दहाने वाढविण्यात येईल आणि तेथे कमी असलेली इंजेक्शनदेखील तातडीने मिळतील, असे आश्वासन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले. तसेच आयसीयू सुरु करण्याची मागणी आपण पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे केल्यावर त्यांनीही तशी ग्वाही दिल्याची माहितीही दरकेर यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना दिली.
वापरानुसारच वीजबिल आकारा; बेस्टसह खासगी वीज कंपन्यांकडे मागणी...
सरकारी व महापालिका रुग्णालयांमध्ये योग्य व्यवस्था नसल्याने नागरिक नाईलाजाने खासगी रुग्णालयांमध्ये जातात व तेथे त्यांची लूट होते. त्यामुळे या दोनही बाबींवर प्रशासनाने उपाययोजना केल्या पाहिजेत. भगवतीमध्ये साहित्य आणि सामुग्री असूनही आयसीयू विभाग सुरू झाला नाही. आमदार श्रीमती चौधरी व नगरसेवक हरीष छेडा यांनीही त्यासाठी पत्रव्यवहार केला होता. तरीही आयसीयू बंद राहिला, हा महापालिकेचा निष्काळजीपण असल्याचा आरोप दरेकर यांनी केला.
सोनारानेच कान टोचले... वाचा कोण आहे सोनार आणि कोणाला दिला घरचा आहेर...
या रुग्णालयात अत्यावश्यक औषधे, गोळ्या व इंजेक्शनचा तुटवडा आहे. 40 हजार रुपयांचे टॉसीझिलीझॅप हे इंजेक्शन रुग्णालयात उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते, पण आमदार चौधरी यांनी ते बाजारातून उपलब्ध केले, याचा अर्थ त्याची साठेबाजी किंवा काळाबाजार होत आहे का, याचीही चौकशी करण्याची मागणीही दरेकर यांनी केली. येथे अन्य औषधे तत्काळ पुरविण्याचे आश्वासनही मंत्र्यांनी दिल्याचेही ते म्हणाले.