ओळख परेडमुळे दमछाक

रश्‍मी पाटील -सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

ठाणे -  यंदा पॅनेल पद्धत असल्यामुळे मतदारांना एकाच वेळी चार उमेदवारांना मतदान करायचे आहे. त्यामुळे प्रस्थापित पक्षाचे उमेदवार इतर प्रभागातील आपल्या पक्षाच्या उमेदवारांची आपल्या प्रभागात ओळख करून देण्यात व्यस्त झाले आहेत. प्रचारासोबत आपल्या पक्षाच्या इतर उमेदवारांची ओळख परेड हा उपक्रम सध्या प्रस्थापित उमेदवारांचा सुरू आहे. त्यामुळे उमेदवारांची चांगलीच दमछाक होत आहे.

पॅनेल पद्धतीनुसार चार प्रभागाचे एकत्रीकरण करून लोकसंख्येनुसार प्रभाग पाडण्यात आले आहेत. या पद्धतीमुळे उमेदवारांच्या प्रभागाच्या कक्षा चौपट झाल्या असून, प्रचाराचे क्षेत्र वाढले आहे. त्यातच आपल्या प्रभागात आपली ओळख असली तरी इतर पक्षाच्या सहकारी उमेदवारांची ओळख आपल्या विभागात करून देण्यासाठी प्रस्थापित उमेदवाराला प्रभागात फिरावे लागत आहे. इतर विभागात आपली ओळख व्हावी यासाठी इतर प्रभागातही उमेदवारांना पायपीट करावी लागत आहे. म्हणजेच अ, ब, क, ड या चार पॅनेलमधील एकाच पक्षाच्या चारही उमेदवारांना प्रभागात ओळख असेलच असे नाही. बऱ्याच ठिकाणी ती नसल्याचे दिसते. त्यामुळे अ पॅनेलमधील उमेदवाराला आपल्याच पक्षाच्या इतर तीन पॅनेलमधील उमेदवारांना घेऊन मतदारांशी ओळख करून द्यावी लागत आहे. हीच पद्धत ब, क, ड पॅनेलमध्ये अवलंबावी लागत आहे. पॅनेलमुळे कमी वेळात मोठ्या परिसरात प्रचार मोहिमा राबवायच्या असताना या ओळख परेडमध्ये बराच वेळ जात आहे. 

नागरिकांसाठी ओळख
पॅनेल पद्धतीमुळे प्रत्येक विभागात लहान-लहान ओळख परेड प्रचार सभा भरवल्या जात आहेत. स्टेज थाटून वेगवेगळ्या परिसरात चारही विभागांतील एक पक्षीय उमेदवार एकत्र येऊन परिसरातील नागरिकांना आपली ओळख करून देत आहेत. काही ठिकाणी सेलिब्रिटींना आमंत्रित करून उमेदवारांच्या ओळख परेडसाठी मतदारांना आकृष्ट केले जात आहे.

Web Title: identity parade

टॅग्स