गुन्हे मागे न घेतल्यास पोलिस ठाण्यांवर मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

मुंबई - मराठा आंदोलकांवर राज्यभरात गंभीर गुन्हे नोंदवले असून, दोन दिवसांत हे गुन्हे मागे घ्यावेत, अन्यथा पोलिस ठाण्यांवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समन्वयकांनी सरकारला दिला आहे. ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना हा इशारा दिला. 

दरम्यान, ३० नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय झाला नाही, तर १ डिसेंबरपासून राज्यभरात पुन्हा मोर्चे काढण्यात येतील, अशी घोषणाही या वेळी करण्यात आली. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, या बैठकीला ठोक मोर्चाचे मोजके समन्वयक वगळता फारसा प्रतिसाद नव्हता. 

दोन दिवसांत गुन्हे मागे घ्या, अन्यथा पोलिस ठाण्यांविरोधात मोर्चा काढण्याचा इशारा हास्यास्पद असल्याची जोरदार टीका पत्रकार परिषदेतच करण्यात आली. राज्यात मराठा क्रांती मोर्चा व मराठा क्रांती ठोक मोर्चा असे दोन गट निर्माण झाल्याचे या बैठकीच्या माध्यमातून आज पुन्हा समोर आले. 

Web Title: If the crime is not back on the march against police stations