मतदानाच्या दिवशी सुट्टी न दिल्यास येथे करा तक्रार

मतदानाच्या दिवशी सुट्टी न दिल्यास येथे करा तक्रार

मुंबई : विधानसभा निवडणूकीचा प्रचार आता थांबला आहे. यानंतर सोमवारी(ता.21) ला आता मतदान होणार आहे. मतदानाचा टक्का वाढावा आणि मतदानाचा हक्क प्रत्येक नागरिकाला बजावता यावा यासाठी 21 ऑक्टोबरला सर्व दुकानं, अस्थापनं, निवासी हॉटेल, नाट्यगृहं, खानावळी, व्यापार, औद्योगिक उपक्रम, निमशासकीय कार्यालयं, मंडळं, महामंडळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मतदानाची सुट्टी ही भरपगारी असणार आहे. कर्मचाऱ्यांना सुट्टी न दिल्यास कार्यालयांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने सांगितले आहे. यासंदर्भात 25 ऑक्टोबरला शासणानं अधिसुचना जाहीर केली होती. अपवादात्मक परिस्थितीत कोणत्या कंपनीला पूर्ण दिवस सुट्टी देणं शक्य नसल्यास  संबधित जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी 2 ते 3 तासांची भरपगारी सुट्टी देणे गरजेचे आहे. त्यामुळे या नियमांचे पालन न करणाऱ्या कार्यालयांची तक्रार कर्मचाऱ्यांना जिल्हा कामगार अधिकाऱ्यांकडे नोंदवता येईल.  

ही तक्रार कर्मचाऱ्यांना बृहन्मुंबई महानगरपालिका अखारित्या येणाऱ्या महापालिकेतील प्रभागनिहाय कार्यालयांमध्ये नोंदवता येईल. त्याच प्रमाणे राज्याचे कामगार आयुक्त कार्यालय येथेही तक्रार नोंदवता येणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com