लोकशाहीचे धिंडवडे काढत असाल तर निवडणुका घेता कशाला?

दिनेश गोगी
शुक्रवार, 18 मे 2018

उल्हासनगर : भाजप राजकारणाचा खालचा स्तर गाठत आहे. लोकशाहीच्या सिद्धांताचे धिंडवडे काढले जात आहेत, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. धिंडवडेच काढत असाल तर निवडणुका घेताच कशाला? असा थेट सवाल करताना राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या थेट नियुक्त्या करा, ईव्हीएम मशीनचा ताण देखील कमी होईल. असा टोमणा देखील त्यांनी ठाकरे शैलीत भाजपाला मारला.

उल्हासनगर : भाजप राजकारणाचा खालचा स्तर गाठत आहे. लोकशाहीच्या सिद्धांताचे धिंडवडे काढले जात आहेत, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. धिंडवडेच काढत असाल तर निवडणुका घेताच कशाला? असा थेट सवाल करताना राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या थेट नियुक्त्या करा, ईव्हीएम मशीनचा ताण देखील कमी होईल. असा टोमणा देखील त्यांनी ठाकरे शैलीत भाजपाला मारला.

काल रात्री उशिराने शिवसेना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केल्यावर आयोजित करण्यात आलेल्या जाहिर सभेत ठाकरे बोलत होते. जेव्हा निवडणुका जाहीर होतात तेव्हाच भाजप राममंदिर बनाएंगे अशी घोषणा करते पण तारीख जाहीर करत नाही. सर्वच यंत्रणा तुमच्याकडे असताना तुम्हाला राममंदिर बनवण्यापासून कोण रोकते?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.पालघर निवडणुकीत भाजपने सर्वस्व पणाला लावले आहे.शिवसेनेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला तर पालघरच नाही राज्यातील सर्व निवडणुका आम्ही जिंकून दाखवू असा निर्धार त्यांनी केला.

उल्हासनगरचा विकास आराखडा विनाशकारी आहे.तीन लाख लोक बेघर होणार आहेत,व्यापार उध्वस्त होणार आहे.असे होणार असेल तर ज्यारीतीने आम्ही मुंबईच्या डीपीला केराच्या टोपलीत टाकले,त्यारीतीने उल्हासनगरचा विनाश करणारा डीपी फाडून चुलीत टाकून जाळणार टाकणार.असा इशारा ठाकरे देतानाच तिथे विकासाची फाईलच चोरी होते तिथे विकास काय होणार?असा टोला देखील त्यांनी लगावला.

ठाण्यात सुसज्ज असे रुग्णालय शिवसेनेने दिले आहे.त्याप्रमाणे उल्हासनगरला रुग्णालयाची भेट शिवसेना देणार.असे आश्वासन ठाकरे यांनी दिले.श्रीकांत शिंदे हे पेशाने डॉक्टर असले तरी ते हाडाचे शिवसैनिक असल्याने त्यांनी अवघ्या चार वर्षात विकास कामांची छाप सोडली.अशी शाबासकी देखील त्यांनी डॉ.शिंदे यांना दिली.यावेळी उल्हासनगरातील पहिला आयएएस अधिकारी झालेला आशिष रावलानी या विद्यार्थ्याचा जाहीर गौरव उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी ठाणे कल्याण मधील खासदार आमदार महापौर सह शिवसेना नेते पालकमंत्री एकनाथ शिंदे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे,उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे,शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, आमदार डॉ.बालाजी किणीकर, विरोधीपक्षनेते धनंजय बोडारे, गटनेते रमेश चव्हाण, ग्राहक संरक्षण कक्षाचे जयकुमार केणी, महिला संघटक मनीषा भानुशाली, युवासेनेचे सोनू चानपूर, बाळा श्रीखंडे, सुमित सोनकांबळे, रोजगार सेनेचे रविंद्र चव्हाण सर्व नगरसेवक उपशहरप्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
 

Web Title: if you dont follow the democracy then why takes election said by uddhav thackeray