Uddhav Thackeray on Nagpur Riots : औरंगजेबाच्या कबरीवरुन सध्या महाराष्ट्रात जोरदार राजकारण सुरु असून त्याचं पर्यावसन नागपूरच्या दंगलीतही झालं आहे. यावरुन आज विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बरीच खडागंजी देखील झाली. दरम्यान, शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणावरुन भाजपला घेरलं आहे. भाजपला जर हिरव्या रंगाचं इतकं वावड असेल तर त्यांनी आपल्या झेंड्यातील हिरवा रंग काढून टाकावा असं त्यांनी म्हटलं आहे.