'हिंमत असेल तर फाॅरेन्सिक ॲाडिट करा'; अन्वय नाईकप्रकरणी उद्धव ठाकरे यांना आव्हान

तुषार सोनवणे
Wednesday, 20 January 2021

भाजपनेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा थेट मुख्यमंत्र्यावर संपत्ती लपवल्याचे आरोप केले आहेत.

मुंबई -  भाजपनेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा थेट मुख्यमंत्र्यावर संपत्ती लपवल्याचे आरोप केले आहेत. महाविकास आघाडीतील एक मंत्री मुलं लपवतात तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपत्ती लपवतात अशी टीका त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केली आहे.

किरीट सोमय्या यांनी अन्वय नाईक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या व्यवहारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणतात की, 'अन्वय नाईक प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे तुम्ही अन्वय नाईक संपत्ती घेतली त्याची माहीती द्या, उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्याचे फाॅरेन्सिक ॲाडिट करा. पैसे किती आला कुठे गेला बंगले किती घेतले यांचे ॲाडिट करा.? तुम्ही 10 कोटींची संपत्ती घेतली आणि 2 कोटी 10 लाखाचे फक्त पुरावे दिले आहेत त्याचे खरेदीखत देखील आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रतिज्ञापत्रात माहीती का लपवत आहेत. असा सनसनाटी आरोप सोमय्या यांनी केला आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथ् क्लिक करा

किरीट सोमय्या यांच्या आरोपांंना शिवसनेकडून  काय उत्तर दिले जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

>

If you have the courage, do a forensic audit Kirit Somaiyas challenge to Uddhav Thackeray


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If you have the courage, do a forensic audit Kirit Somaiyas challenge to Uddhav Thackeray