‘आयआयटी’ परिवर्तनाचे साधन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

मुंबई - भारतीय तंत्रज्ञान संस्थेला देशात, जगात ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी’ म्हणून ओळखले जात असले, तर आज त्याची व्याख्या बदलली आहे. हे फक्त तंत्रज्ञानापुरते मर्यादित राहिली नाही, तर ‘आयआयटी’ म्हणजे ‘इंडियाज इन्स्ट्रुमेन्ट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन’ (भारताच्या परिवर्तनाचे साधन) झाले असल्याचे गौरवोद्‌गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल येथे काढले. 

‘आयआयटी’ मुंबईच्या ५६ व्या वार्षिक दीक्षान्त समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमास राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर आदी उपस्थित होते. 

मोदी म्हणाले, ‘‘गेल्या सहा दशकांत ‘आयआयटी’ने केलेल्या निरंतर प्रयत्नांमुळे आज या संस्थेने देशातील नामांकित संस्थांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. ‘आयआयटी’ आणि येथील पदवीधरांच्या उल्लेखनीय कार्याचा देशाला अभिमान आहे. ‘आयआयटी’च्या यशाने देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांची निर्मिती झाली, त्यांची ‘आयआयटी’ ही प्रेरणा आहे. त्यामुळे भारत हे जगातील सर्वांत मोठे तांत्रिक मनुष्यबळ असलेले केंद्र बनले आहे.’’  स्टार्ट अपची क्रांती ज्या वेगाने देशात झाली, त्याचा स्रोत आपल्या ‘आयआयटी’ आहेत, असे सांगून, आज जग ‘आयआयटीं’ना युनिकॉर्न स्टार्ट अप्सची नर्सरी म्हणून ओळखत आहे. तंत्रज्ञानाचा आरसा असलेल्या या संस्थांमधून जगाचे भविष्य आपल्याला दिसत आहे, असे ते म्हणाले. 

‘आयआयटी’ बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष दिलीप शंघवी यांनी प्रास्ताविक केले. संचालक प्रा. देवांग खक्कर यांनी अहवालाचे सादरीकरण केले. सिम्फनी एआय ग्रुपचे अध्यक्ष डॉ. रोमेश वाधवानी यांना डॉक्‍टर ऑफ सायन्स ही मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. मोदी यांच्या हस्ते ‘आयआयटी’ मुंबईच्या ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी, तसेच पर्यावरण विज्ञान आणि अभियांत्रिकी केंद्राच्या इमारतीचे उद्‌घाटन करण्यात आले. दीक्षान्त समारंभात २६२१ विद्यार्थ्यांना विविध विषयांतील पदवी प्रदान करण्यात आली, तर ३८० विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवीने सन्मानित केले. 

केंद्राकडून एक हजार कोटी
 ‘आयआयटी’ मुंबईला केंद्राच्या मानव संसाधन विभागाच्या वतीने एक हजार कोटी रुपयांचे साह्य देण्यात आले आहे. त्यातून उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत.

Web Title: IIT Bombay 56th annual convocation ceremony