आयआयटी मुंबईच्या दीक्षांत सोहळ्यात ३७८ विद्यार्थ्यांना 'पीएचडी' प्रदान

यंदाही आभासी अवतार पद्धतीने विद्यार्थ्यांनी स्वीकारली पदवी
IIT mumbai
IIT mumbaisakal media

मुंबई : कोरोना महामारीच्या (corona pandemic) पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता (student safety) लक्षात घेऊन, आयआयटी मुंबईचा (IIT Mumbai) 59 वा दीक्षांत सोहळा आज आभासी-वास्तव (VR) पद्धतीने साजरा झाला. कोरोना मुळे यंदाही हा सोहळा तंत्रज्ञानाच्या साह्याने आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आला होता. त्यात पदवी मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा आणि आयआयटीचे संचालक प्रा सुभाशीष चौधरी (subhasis chaudhari) यांचाही आभासी अवतार तयार करण्यात आला होता. सर्व पदक विजेत्यांच्या अवतारांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि टोरंटो विद्यापीठाचे प्रोफेसर जेफ्री हिंटन यांच्या हस्ते पदके प्रदान करणायात आली.

यावेळी एकूण 2501 पदव्या प्रदान करण्यात आल्या. यात 178 पी एच डी, 36 एमटेक/ एमफील आणि पीएचडी, 26 दुहेरी पदवी, (एमएससी, पीएचडी), 8 एमएस, 689 एम टेक, 63 एमडी , 18 दुहेरी पदवी (बीडीs+एमडी), 13 एम फील, 109 एमबीए, 1 इईमबीए, 7 एमपीपी, 235 दोन वर्षे एमएससी, 324 दुहेरी पदवी (बीटेक +एम टेक ), 663 बी टेक पदव्या, 12 आंतरशाखीय दुहेरी पदवी (बीटेक / बीएस +एमटेक / एमएससी), 8 दुहेरी पदवी (बीएस + एमएससी), 49 बीएस, 14 बीडी, and 20 पीडीजीआयआटी. यासह, 28 संयुक्त पीएचडी देण्यात आल्या.

IIT mumbai
सर्व शाळा १५ ऑगस्टला ध्वजवंदन करून सुरू कराव्यात, सरकारकडे मागणी

यावर्षी, 38 संशोधन स्कॉलरची नाईक आणि रस्तोगी पीएचडी उत्कृष्टता पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.तीन विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी सुवर्णपदकांनी गौरवण्यात आले. प्रेसिडेंट ऑफ इंडिया पुरस्कार, सिद्धार्थ चांडक या बी टेक च्या विद्यार्थ्याला देण्यात आला. ‘इन्स्टिट्यूट गोल्ड मेडल’ आणि डॉ शंकर दयाल शर्मा सुवर्ण पदक, मनु श्रीवास्तव या भौतिकशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्याने जिंकली. त्याशिवाय, विविध विभागांमध्ये अव्वल आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले.

यावेळी संस्थेचा वार्षिक अहवाल सादर करतांना संचालक प्रा सुभाशिष चौधरी म्हणाले की, आजही पदवीपूर्व आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थांची आयआयटी मुंबईलाचा सर्वाधिक पसंती असते. कोरोनाच्या काळातही आमच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले नाही, हे नमूद करतांना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे, असे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com