Darshan Solanki case : आयआयटी विद्यार्थी दर्शन सोळंकी प्रकरणात अटक आरोपी अरमान शेखची जामिनावर सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Darshan Solanki death case

Darshan Solanki case : आयआयटी विद्यार्थी दर्शन सोळंकी प्रकरणात अटक आरोपी अरमान शेखची जामिनावर सुटका

Darshan Solanki case : आयआयटी बॉम्बेचा विद्यार्थी दर्शन सोलंकी याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपात अटक करण्यात आलेल्याअरमान खत्री या दर्शन सोबत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला मुंबईतील विशेष न्यायालयाने शनिवारी जामीन मंजूर केला आहे.

न्यायालयाने अरमान खत्रीला 25000 रुपयांचा रोख जामीन अटी शर्थीसह मंजूर केला आहे.अरमान खत्रीला 9 एप्रिल रोजी पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने अटक केली होती आणि त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या आरोपात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस तपास

मूळचा अहमदाबादचा असलेला आणि मुंबईतील आयआयटीचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी दर्शन सोलंकीचा 12 फेब्रुवारी रोजी आयआयटी कॅम्पसमधील वसतिगृहाच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती.

या प्रकरणात तपास करणाऱ्या मुंबई पोलीसांच्या विशेष पथकाला घटनेच्या तीन आठवड्यांनंतर दर्शन सोलंकीच्या खोलीतून सुसाईड नोट मिळाली. या नोटमध्ये अरमानला आत्म्हत्येबद्दल दर्शनला प्रवृत्त केल्याचे म्हटले होते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूच्या दोन दिवस आधी सोलंकी यांनी खत्री यांच्याशी झालेल्या संभाषणात जातीयवादी टिप्पणी केली होती,

त्यानंतर झालेल्या वादात रागात अरमान खत्रीने दर्शनला पेपर कटरने धमकावले होते. या घटनेमुळे दर्शन सोळंकी घाबरला होता.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलंकी याने खत्री यांना व्हॉट्सअॅप मेसेज पाठवून माफी मागितली होती तसेच मुंबई सोडून घरी परत असल्याचे सांगितले होते.

अरमानला लक्ष केल्याचा दावा

अरमान खत्रीने दाखल केलेल्या जामीन अर्जात आपल्याला या प्रकरणात लक्ष्य करून गोवण्यात आल्याचे म्हटले आहे. अर्जात अरमान खत्रीने थेट दर्शन सोलंकी यांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा कोणताही पुरावा नसल्याचा दावा केला आहे.

अर्जात पुढे म्हटले आहे की, दर्शन सोलंकीच्या पालकांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत अरमान खत्रीवर कधीही आरोप केले नाहीत. अरमान हा एक तरुण विद्यार्थी आहे ज्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तसेच अशा तुरुंगवासामुळे त्याचे भविष्य बाधित होईल, असे याचिकेत म्हटले आहे.