दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरण: सुसाईड नोट एसआयटीच्या हाती... पवई पोलिसांच्या तपासावर प्रश्न चिन्ह? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SIT

आयआयटी बॉम्बेचे विद्यार्थी दर्शन सोळंकी याच्या आत्महत्येचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाला म्हणजेच एसआयटीला दर्शनची आत्महत्येपूर्वीची सुसाईड नोट सापडली.

Mumbai Crime : दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरण: सुसाईड नोट एसआयटीच्या हाती... पवई पोलिसांच्या तपासावर प्रश्न चिन्ह?

मुंबई - आयआयटी बॉम्बेचे विद्यार्थी दर्शन सोळंकी याच्या आत्महत्येचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाला म्हणजेच एसआयटीला दर्शनची आत्महत्येपूर्वीची सुसाईड नोट सापडली. या नंतर आता एसआयटी आधी या प्रकरणात तपास करत असलेल्या स्थानिक पवई पोलिसांना दर्शनची सुसाईड नोट का मिळाली नाही हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दर्शनाच्या आत्महत्येनंतर दोन आठवड्यांनंतर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीला वसतिगृहातील खोली क्रमांक 802 मध्ये सुसाईड नोट सापडल्यानंतर पवई पोलिसांनी केलेल्या तपासातील त्रुटी समोर आल्या. त्यामुळे पवई पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष घालणार असल्याचे पोलीस विभागातील सुत्रांनी सांगितले आहे.

पवई पोलिसांच्या तपासावर प्रश्न?

पवई पोलिसांनी दर्शनच्या वसतिगृहातील खोलीची झडती घेतली मात्र कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. एसआयटी प्रमुख पोलीस आयुक्त लखमी गौतम यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाला एसआयटीला नंतर तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. तपासा दरम्यान त्यांना दर्शनने लिहिलेल्या प्रश्नोत्तरांच्या शेवटच्या पानावर सुसाईड नोट सापडली ज्यामध्ये त्याने सहकारी वसतिगृह अरमान इक्बालला दोष दिला होता. एसआयटीला दर्शनच्या अभ्यासाच्या टेबलाखाली सुसाईड नोट सापडली. पवई पोलिसांना ही नोट कशी सापडली नाहीत, हे अजूनही गूढ आहे. पवई पोलीस आणि गौतम यांच्या अध्यक्षतेखालील एसआयटीने मात्र कॅम्पसमध्ये या प्रकरणी चौकशी केलेल्या एकाही विद्यार्थ्यांनी जातीय भेदभाव केल्याचा दावा मान्य केला नाही, असे म्हटले आहे.

दर्शनच्या पालकांचे आक्षेप

दर्शन सोलंकीच्या कथित आत्महत्येच्या प्रकरणाला अनपेक्षित वळण मिळाले जेव्हा त्याचे वडील, बहीण आणि आत्या यांनी एसआयटीने शोधलेल्या दर्शनच्या सुसाईड नोटवर आक्षेप घेतला. सुसाईड नोटवरील हस्ताक्षर दर्शनसारखे दिसत नसल्याचा दावा दर्शनच्या वडिलांनी बहिणीने आणि आत्याने केला. फक्त त्याच्या आईने पूर्वी सांगितले होते की हस्ताक्षर त्यांच्या मुलासारखे दर्शनसारखे दिसत असल्याचे सांगितले होते.

अट्रोसिटीच्या तरतुदीप्रमाणे गुन्ह्याची नोंद

दर्शन सोळंकीने आयआयटी वसतिगृहाच्या इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्यानंतर दीड महिन्यानंतर पवई पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल आणि अट्रोसिटी कायद्या कलमान्वये गुन्हा नोंदवला. बुधवारी दुपारी, दर्शनचे आई-वडील रमेश भाई आणि तारलिका सोलंकी, कुटुंबातील इतर सदस्य आणि वकिलासमवेत पवई पोलिस स्टेशनला पोहोचले. त्यांनतर पवई पोलिसांकडून त्यांचे जबाब नोंदवण्यात आले आणि गुन्हा नोंदवण्यात आला.

मुख्यमंत्र्यांना पत्र

बुधवारी दर्शनच्या पालकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांना पत्र लिहिले. पत्रात या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन केलेल्या मुंबई गुन्हे शाखेचे विशेष तपास पथक एसआयटी त्यांच्यावर दबाव टाकत असल्याचा आरोप केला होता. लिहिलेल्या पत्रात असेही म्हटले आहे की पोलिस आणि विशेष तपास पथकाच्या सदस्यांच्या वागणुकीमुळे कुटुंब "संपूर्णपणे निराश" झाले असल्याचे म्हंटले आहे.त्यांनी लिहिलेल्या पत्रात पवई पोलिसानी केलेल्या तपासावर प्रश्न उपस्थित केले आहे. तसेच पवई पोलिसांच्या एकंदरीत या प्रकरणबाबत दृष्टी कोणावर प्रश्न केले आहे.

'सुसाईड नोटची प्रत, एडीआर कॉपी आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टसह त्यांनी आमच्याकडून मागितलेली सर्व कागदपत्रे आम्ही दिली आहेत. आम्ही त्यांना बीएमसीकडून मृत्यू प्रमाणपत्र मिळवून देण्यासही मदत केली. आम्ही अनेक विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवले आहेत आणि त्यापैकी कोणीही जाती भेदाबद्दल बोलले नाहीत.आम्ही दर्शन सोळंकीच्या पालकांचे जबाब नोंदवले आहे. त्यांच्या जबानीच्या आधारे भारतीय दंड संहितेच्या कलम 306 (आत्महत्येला प्रवृत्त करणे) आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, 1989 कलमानुसार अज्ञाता विरोधात पवई पोलिसात गुन्हा नोंदवला आहे . या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

- लखमी गौतम ,सह पोलिस आयुक्त (गुन्हे शाखा)

टॅग्स :policestudentIITSIT