नीट-जेईईच्या विद्यार्थ्यांसाठी आयआयटीचे विद्यार्थी सरसावले; प्रवासाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार

तेजस वाघमारे
Monday, 31 August 2020

जेईई आणि नीट या केंद्रीय सामायिक प्रवेश परीक्षा 1 सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. कोरोनामुळे परीक्षा केंद्रांवर पोचण्यासाठी विद्यार्थाना वाहतूक सेवा उपलब्ध होणे कठीण होणार आहे.

मुंबई : जेईई आणि नीट या केंद्रीय सामायिक प्रवेश परीक्षा 1 सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. कोरोनामुळे परीक्षा केंद्रांवर पोचण्यासाठी विद्यार्थाना वाहतूक सेवा उपलब्ध होणे कठीण होणार आहे. यामुळे परीक्षा केंद्रापर्यंत कसे पोहचायचे असा प्रश्न  लाखो विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. या विद्यार्थ्यांसाठी आयआयटी मुंबईतील आजी-माजी विद्यार्थी सरसावले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेला पोहोचण्यासाठी प्रवासाच्या अडचणी आहेत, अशा विद्यार्थांना प्रवास आणि आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे.

लॉकडाऊनमध्ये सिगारेटची लत पडली महागात; दुकानदाराला गंडवण्याच्या नादात थेट तुरूंगात रवानगी

देशभरातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवासाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी संकेतस्थळ सुरू करून त्यावर नोंदणी सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना आपली माहिती, पीन कोडसह भरावी लागणार आहे. तसेच परीक्षेसाठी असलेले ऍडमिट कार्ड यांचीही माहीती भरावी लागणार आहे. तर स्वंयसेवकांसाठीही त्यांच्याकडे असलेली वाहने, प्रवासाचे ठिकाण, कोणत्या प्रकारची आर्थिक मदत या प्रवासासाठी दिली जाणार आहे, याची माहिती भरावी लागणार आहे.

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणः सलग तिस-या दिवशी रियाची चौकशी

जेईई आणि नीट या परीक्षा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने त्या पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी देशभरातून केली जात असतानाही त्यावर सर्वोच्च न्यायालयाने आणि केंद्र सरकारनेही अद्याप कोणताही दिलासा दिला नाही. यामुळे 1 सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या या परीक्षांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागणार आहे. यामुळे आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी यासाठी पर्याय शोधला आहे. त्यासाठी आयआयटी मुंबईतील ‍ विद्यार्थ्यांनी  जेईई आणि नीट परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना प्रवासासाठी अडचण असल्यास त्यासाठीच https://www.eduride.in/ नावाने  एक संकेतस्थळ सुरू केले असून त्या विद्यार्थ्यांसोबतच  ज्यांच्याकडे वाहने आहेत, त्यांचीही नोंदणी करून संबंधित विद्यार्थ्यांना सेवा पुरविण्यासाठीची सोय करून दिली जाणार आहे. ज्यांना कॅबसारखी वाहने ‍विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देता येतील त्यांनी त्यासाठी आर्थिक मदत अथवा वाहनांसाठीची बुकिंग करून द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

हिवाळ्यात कोरोना रौद्ररुप घेणार; जागतिक आरोग्य संघटनेचा गंभीर इशारा

देशभरातील जेईई-नीट परीक्षा देणार आहेत, त्यांना अधिकाधिक संपर्क व्हावा यासाठी अनेक आजी -माजी विद्यार्थी समोर आले असून यासाठी फेसबूक, इन्स्टाग्राम, आदी सोशल मीडियावर मोहीम उघडण्यात आली असल्याची माहिती आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांकडून देण्यात आली.

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IIT students rallied for NEET-JEE students; Travel arrangements will be made