मलबार हिल परिसरात ७० हजारांचा अवैध दारूसाठा जप्त

मलबार हिल परिसरात ७० हजारांचा अवैध दारूसाठा जप्त

मुंबई : मुंबई शहर जिल्ह्यात मलबार हिल परिसरात ७० हजार रुपयांचा अवैध दारू साठा जप्त करण्यात आला आहे. भारत जयराम वने या आरोपीला अटक केली असून, निवडणुकीच्या काळात अवैध मद्यविक्रीला चाप लावण्यासाठी ही कारवाई केली जात असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सी. बी. राजपूत यांनी सांगितले.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून मलबार हिल परिसरात अवैध मद्यविक्रीवर कारवाई केली. या परिसरात राहणारा भारत जयराम वने हा अवैध विदेशी मद्य विकत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या कारवाईत विदेशी मद्य, वाईन, बिअरचा साठा आढळून आला.

या मुद्देमालाची किंमत सुमारे ७० हजार असून आरोपीविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (ई), १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक गजानन राजूरकर, पोलिस अधिकारी विनय शिर्के, अविनाश धरत, जगदीश देशमुख, संताजी लाड यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com