खारघरमध्ये बेकायदा फलकांचा सुळसुळाट

सकाळ वृत्‍तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिक संतप्त

मुंबई : खारघर परिसरात खासगी शिकवणी वर्ग, व्यायामशाळांची जाहिरात आणि राजकीय नेत्यांना शुभेच्छा देणारे बेकायदा फलक झळकत असल्यामुळे परिसर होर्डिंगमय बनला आहे.

न्यायालयाने अनेक वेळा बेकायदा फलकांविषयी निर्देश देऊनही राजकीय नेते आणि पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यावर पालिका प्रशासनाने खारघर परिसरातील सर्व फलक आणि होर्डिंग्ज काढल्यामुळे खारघर होर्डिंग्जमुक्त झाले होते; मात्र पालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे खारघर परिसरात व्यायामशाळा, खासगी शाळा, शिकवणी वर्ग तसेच विविध संस्थांकडून रोपलागवड आणि राजकीय नेत्यांना शुभेच्छा देणारे फलक सध्या पाहावयास मिळत आहेत. काही विकासकांनी  रस्त्यावर घरांच्या जाहिरातींचे फलक लावले आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: illegal boards in khatghar