बेकायदा बांधकामांवरील कारवाई कधी पूर्ण करणार?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

मुंबई - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत असलेली सुमारे 66 हजार बेकायदा बांधकामांवर कारवाई कधी पूर्ण करणार ? असा सवाल उच्च न्यायालयाने केला आहे. तसेच बांधकामांवर कारवाई संदर्भातील कालबद्ध कार्यक्रम सादर करण्याचा आदेश खंडपीठाने महापालिकेला दिला.

ज्योती डांगे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक यांच्या खंडपीठापुढे होती. 66 हजार बेकायदा बांधकामांपैकी आतापर्यंत एक हजार 300 बांधकामांवर गेल्या दीड वर्षात कारवाई करण्यात आल्याची माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेने खंडपीठाला दिली. दरम्यान, नवी मुंबई महापालिकेला बेकायदा बांधकामे तोडण्याचा जो क्रम लावून दिला आहे, त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही कारवाई करावी, असे सांगत खंडपीठाने सुनावणी तहकूब केली.

Web Title: illegal construction crime high court