भिवंडीत अवैध बांधकामे हटवली

भिवंडीत अवैध बांधकामे हटवली

भिवंडी : भिवंडीत महसूल विभागाने न्यायालयाच्या निर्देशानुसार आजपासून पुन्हा अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाईला सुरुवात केली आहे. तहसीलदार शशिकांत गायकवाड यांच्या पथकाने मौजे कारिवली ग्रामपंचायत हद्दीतील सरकारी जमीन सर्व्हे क्र. 164 मध्ये अवैधपणे बांधकाम केलेले 45 वाणिज्य गाळे व 20 निवासी घरांची बांधकामे जेसीबी मशीनच्या सहाय्याने तोडून अतिक्रमण हटवण्यात आले. यावेळी अनूचित प्रकार घडू नये यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी विशेष पोलिस बंदोबस्त ठेवला होता. 

भिवंडी शहरासह ग्रामीण भागातील हरित पट्ट्यासह सरकारी जमिनी व खासगी मालकीच्या जमिनींवरील अनधिकृत बांधकामांसंबंधी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या निर्णयाच्या अनुषंगाने भिवंडीतील गोदामे व घरे अनधिकृत ठरवून या बांधकामांवर 15 फेब्रुवारीपर्यंत कारवाई करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशाने विविध प्राधिकरणाच्या माध्यमातून या बांधकामांवर कारवाई करण्याची मोहीम संबंधित प्राधिकरणाने हाती घेतली आहे. या धडक कारवाईमुळे सरकारी जमिनींवर अवैधपणे कब्जा करून बांधकामे करणाऱ्या अतिक्रमण धारकांमध्ये खळबळ माजली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com