बेकायदा फलक हटवा; अन्यथा अवमान कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जुलै 2018

मुंबई - शहराला बकाल करणारे बेकायदा फलक तातडीने हटवा; अन्यथा न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाल्याप्रकरणी कारवाईला सामोरे जा, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकार; तसेच महापालिकांना समज दिली.

मुंबई, नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद आणि अमरावती महापालिकांनी फलक हटवण्यासाठी कोणती पावले उचलली, याची प्रभागवार आकडेवारीसह माहिती देण्याचा आदेशही न्या. अभय ओक आणि रियाज छागला यांच्या खंडपीठाने दिला. बेकायदा फलक हटवण्याबाबत वारंवार आदेश देऊनही अनेक महापालिकांनी त्याची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे ही शेवटची संधी असल्याचे सांगत न्यायालयाने सरकार; तसेच पालिकांची कानउघाडणी केली.

न्यायालय म्हणाले...
- बीट मार्शल व गस्त पथकांमार्फत लक्ष ठेवावे
- संबंधितांवर "एफआयआर' नोंदवावा
- नोंदवलेल्या गुन्ह्यांबाबत कारवाईचे स्पष्टीकरण द्या
- होर्डिंग्जवर निवडणूक आयोगानेही लक्ष ठेवावे

Web Title: illegal hording crime high court