कोकण भवन परिसरात बेकायदा झोपड्या

कोकण भवन परिसरात बेकायदा झोपड्या
कोकण भवन परिसरात बेकायदा झोपड्या

नवी मुंबई : सीबीडी बेलापूर येथील कोकण भवन परिसरात बेकायदा झोपड्या वाढू लागल्या आहेत. या झोपड्यांवर सिडको प्रशासनामार्फत अधूनमधून कारवाई केली जात असली, तरी या ठिकाणी पुन्हा झोपड्या उभ्या राहत असल्याने प्रशासन हतबल झाले आहे. 

शहरात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. पालिका व सिडको प्रशासनामार्फत या बांधकामांवर कारवाई करण्यात येत असली, तरी भूमाफियांवर वचक ठेवणे शक्‍य न झाल्याने ठिकठिकाणच्या मोकळ्या जागांवर झोपड्या, पत्र्याची शेड उभे राहत आहेत. कोकण भवन व जुन्या महापालिका मुख्यालयामधील मोकळी जागा सिडकोच्या अखत्यारीत येतो. त्या ठिकाणी सप्टेंबर महिन्यातच सिडको प्रशासनाने कारवाई केली होती; मात्र पुन्हा या जागेत शे-दीडशे झोपड्या उभ्या राहिल्या आहेत. याबाबत सिडको प्रशासनाच्या अनधिकृत बांधकाम विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, सिडकोमार्फत येथे वारंवार कारवाईं करण्यात येते; मात्र काही महिन्यांनी पुन्हा झोपड्या उभ्या राहिल्या आहेत. यापूर्वी दोनदा येथे कारवाई करण्यात आली होती. येथील अतिक्रमणे थांबावी, याकरिता भूखंडाला तारेचे कुंपण घालण्यास तसेच तेथे सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या भूखंडावर तारेचे कुंपण दिसते; पण सुरक्षा रक्षक दिसत नाहीत. सुरक्षा रक्षक तैनात केल्यास येथे पुन्हा झोपड्या उभ्या राहणार नाहीत, असे मत स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

या बेकायदा झोपड्यांमुळे हा परिसर बकाल, घाणेरडा दिसत आहे. या ठिकाणी गुन्हेगारीही वाढण्याची शक्‍यता असून या भागात अतिक्रमण होऊ नये, याकरिता कठोर कारवाई करणे व भूमाफियांवर वचक बसवणे गरजेचे आहे. 
- मनोज पवार, स्थानिक नागरिक. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com