अवैध दारूच्या वाहतूकीवर क्राइम ब्रांचची धाड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

फेबिया स्कोडा कार क्रमांक MH 01- AR- 3820 मध्ये किंगफीशर 31 बाँक्स, एकूण 24,960/-  रू. किंमतीची अवैध दारूची वाहतूक करताना आढळून आली.

पालघर - बोइसर येथे काल (ता. 27) सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा बोईसर युनिट हे पेट्रोलिंग करीत होते. यावेळी चिचंणी पाटीलपाडा येथे फेबिया स्कोडा कार क्रमांक MH 01- AR- 3820 मध्ये किंगफीशर 31 बाँक्स, एकूण 24,960/-  रू. किंमतीची अवैध दारूची वाहतूक करताना आढळून आली. 2,50,000/- रू. किमंतीची कार असा 2,74,960/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्यावरील चालक (वय 25) यास पुढील कारवाई करिता वाणगाव ठाणे येथे ताब्यात देण्यात आले आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक श्री हेगाजे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पो. निरीक्षक चाळके, सहा. फौज ताम्हाणे, पोलिस नाईक मर्दे, नरेंद्र पाटील यांनी केली आहे.

Web Title: illegal liquor found in palghar